Crime News Pudhari
राष्ट्रीय

Crime News : तिरुपती हादरले! लग्नावेळी नातेवाईकांमध्‍येच वाद; भररस्त्यात डबल मर्डर

मुलीच्या लग्नातच पत्नीपासून अलिप्त राहणाऱ्या पतीने केला नातेवाईकांवर हल्ला

पुढारी वृत्तसेवा

Tirupati double murder : प्रसिद्ध देवस्थान असलेल्या तिरुपती शहरात एका लग्न सोहळ्यादरम्यान झालेल्या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. जुन्‍या कौटुंबिक वादातून दोघांवर प्राणघातक हल्ला झाला. एक जण घटनास्थळीच ठार झाला, तर दुसऱ्याचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.

कौटुंबिक वादातून हत्याकांड

प्राथमिक तपासात हे हत्याकांड कौटुंबिक वादाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. येरपडू मंडळातील जंगलपल्ली गावातील सुनील नावाच्या मुख्य आरोपीने त्याचा भाऊ, बहीण आणि इतर एका नातेवाईकाच्या मदतीने हा हल्ला केल्याचा संशय पोलिसांना आहे.

संशयित पत्नीपासून अनेक वर्षांपासून राहत होता वेगळा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या पत्नीपासून वेगळा राहत होता. सुनील बुधवारी रात्री 'पद्मावती कल्याण मंडपम' येथे एका लग्नाला येणार असल्याची माहिती त्याची सासू संपूर्णम्मा हिला मिळाली. तिने ही माहिती मुनिरत्नम आणि मणिकांता यांना दिली. या दोघांनी मुलीचे लग्न ठरविण्यास मदत केली होती. मुनिरत्नम आणि मणिकांता यांनी लग्नकार्यालयाजवळ सुनीलला गाठले. या दोघांनी सुनीलला पत्नीला का सोडले, असा जाब विचारला. यावरून त्यांच्यात जोरदार वाद सुरू झाला. वाद वाढत असतानाच सुनीलचे नातेवाईकही तिथे आले आणि भांडण विकोपाला गेले.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

तिरुपतीमधील तिरुचानूर रोडवरील विवाह कार्यालयाबाहेरच बुधवारी रात्री ९:४० च्या सुमारास आरोपींनी मुनिरत्नम आणि मणिकांता यांच्यावर सुऱ्याने सपासप वार केले. मुनिरत्नम यांचा मृत्यू झाला होता, तर मणिकांता हे गंभीर जखमी अवस्थेत होते. त्यांना तातडीने सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केला. आरोपी तिरुपती सोडून जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांचा माग काढला आणि त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची तपासणी केली जात असून, प्रत्यक्षदर्शींनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ क्लिप्सही पोलीस पडताळून पाहत आहेत. यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT