Three sisters marry one man | तिन रिलस्टार बहिणींनी एकाच मुलाशी बांधली लग्नगाठ!  
राष्ट्रीय

Three sisters marry one man | तिन रिलस्टार बहिणींनी एकाच मुलाशी बांधली लग्नगाठ! उत्तरप्रदेशातील घटनेने सारेच चक्रावले, हिंदू संघटना झाल्या आक्रमक!

तिन्ही बहिणींनी व्हिडीओतून केले आपल्या निर्णयाचे समर्थन, तिघीही राहणार एकत्र

Namdev Gharal

Three sisters marry one man उत्तरेकडील राज्यांमधून अनेक अकल्पनिय घटना समोर येत असतात. खून, दरोडे हे नेहमीचेच पण आता लग्नातही अनोखा विक्रम येथील तिन बहीणींनी केला आहे. अमरोही उत्तरप्रदेश येथून ही गोष्ट समोर आली आहे. यामध्ये एका कुटुंबातील दोन सख्ख्या बहीणी व एक चुलत बहीण अशा तिघींनी मुलाच्या गळ्यात वरमाला घातल्या आहेत तेही एकाचवेळी. सोशल मिडीयावर आता याची जोरदार चर्चा सुरु झाली असून प्रतिक्रीयांचा पूर आला आहे. या व्हिडीओत दिसतो की हा मुलगा एकाचवेळी तिन्ही बहीणींच्या भांगेत सिंदूर भरत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की हसनपूर भागातील धौरिया गावातील रहिवासी असलेल्या सरोज, सावित्री आणि संतोष या तिघी बहीणी सोशल मिडीया इन्ल्यूअन्सर आहेत. तिघीही इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवर सक्रिय असून त्यांच्या व्हिडिओ रील्समुळे त्यांना स्थानिक पातळीवर ओळख मिळाली आहे. या तिघींनी त्‍यांचे व्हिडीओ शूटींग करणाऱ्या विकू नावाच्या मुलाबरोबर एकाच मुलासोबत लग्न गाठ बांधली. मिळालेल्या माहितीनुसार, सरोज बी.टेकच्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी आहे, तर सावित्री आणि संतोष यांनी इंटरमिजिएटचे शिक्षण पूर्ण केले आहे.

आता या प्रकरणी हिंदू सघटना आक्रमक झाल्या असून त्‍यांनी निषेध व्यक्त केला जात आहे. तर , पोलिसांनी सांगितले आहे की, तिन्ही महिलांनी स्वेच्छेने लग्न केल्याचे म्हटले आहे. कोणी लेखी तक्रार दाखल केल्यास चौकशी केली जाईल. लग्नाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हे प्रकरण चर्चेचा विषय बनले आहे.

सहा महिन्यांपासून बहिंणीसोबत होता कॅमेरामन म्हणून

हा मुलगा श्यामपुरी गावचा रहिवासी असून त्‍याचे नाव विकास ऊर्फ विकू असल्याचे समजते असलेला, गेल्या सहा महिन्यांपासून त्या तीन बहिणींसोबत कॅमेरामॅन म्हणून काम करत होता. व्हिडिओ शूट करण्याव्यतिरिक्त, तो त्यांच्यासोबत विविध कंटेंटमध्ये अभिनयही करत असे. या व्हिडीओ करता करता ते चौघे एकमेकांच्या खूप जवळ आले आणि त्यांनी लग्न करण्यावचा निर्णय घेतला. समोर आलेल्या माहितीनुसार, १७ जुलै रोजी चामुंडा माता मंदिरात वैदिक रितीरिवाजानुसार त्या तीन बहिणी आणि विकास यांचा विवाह झाला. लग्नाला दोन्ही कुटुंबांतील कोणीही सदस्य उपस्थित नव्हते. लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लग्नानंतर राहायचे आहे एकत्र

तिन्ही बहिणी सांगतात की, लहानपणापासूनच त्या नेहमी एकत्र राहतात आणि लग्नानंतरही त्यांना वेगवेगळ्या घरी जायचे नव्हते. घरच्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी नातेसंबंध जुळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी एकाच तरुणाशी एकत्र लग्न करण्याचा निर्णय घेतला. या तिघांच्या भावना जाणून घेतल्या आणि त्यांच्या इच्छेला मान देऊन हा निर्णय घेतल्याचे विकास याने सांगितले आहे.

पुर्वीच्या काळी राजे महाराजही अनेक लग्न करत

या लग्नाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर काही हिंदू संघटनांनी मंदिर परिसरात अशा लग्नाला आक्षेप घेत याला धार्मिक परंपरेच्या विरोधात म्हटले आहे. विरोध वाढत असताना, तिन्ही बहिणींनी एक व्हिडिओ जारी केला की त्यांनी स्वतःच्या इच्छेने लग्न केले आहे आणि त्या सर्व सज्ञान आहेत. प्राचीन काळी दशरथ राजाला तीन राण्या होत्या तर त्यांचा निर्णय चुकीचा होता का असाही प्रश्न या बहिणींनी उपस्थित केला आहे.

प्रत्‍यक्ष लग्न की केवळ रिल्स बनवण्यासाठी

दरम्यान, हसनपूर कोतवालीचे प्रभारी राजेश कुमार तिवारी यांनी सांगितले की, स्थानिकांकडून या प्रकरणाची माहिती मिळाली आहे. ही रील बनवली होती किंवा लग्न प्रत्यक्षात झाले होते की नाही हे त्याला माहीत नाही, पण कोणीही आक्षेप घेत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली नाही किंवा लग्न झालेल्या तीन बहिणींनी त्याच्याशी संपर्क साधलेला नाही. अशी माहिती त्‍यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT