Russian oil supply | तीन कोटी बॅरल रशियन तेल भारतात; पुरवठा होणार सुरळीत 
राष्ट्रीय

Russian oil supply | तीन कोटी बॅरल रशियन तेल भारतात; पुरवठा होणार सुरळीत

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे आखाती देशांतून होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. या तणावामुळे अमेरिकेने गेल्या सप्ताहात रशियन तेल खरेदीस हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच तब्बल 3 कोटी बॅरल रशियन तेल भारतात दाखल झाले आहे.

गतवर्षी अमेरिकेने भारतावर रशियन तेल खरेदीसाठी 25 टक्के दंडात्मक शुल्कवाढ केली होती. रशियन तेल खरेदीवरून सातत्याने राजनैतिक दबाव टाकण्यात येत होता. इराणवरील हल्ल्यांनंतर भारताची इंधन सुरक्षा धोक्यात आली आहे. अमेरिकेने गेल्या सप्ताहात रशियन तेल खरेदीसाठी काहीकाळ सवलत देऊ केली आहे. त्यानंतर इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी), रिलायन्ससह काही कंपन्यांनी विकल्या न गेलेल्या रशियन तेलाची खरेदी केली आहे. यातील बहुतांश तेल जहाजामध्ये भरलेले होते. मात्र, त्याला खरेदीदार नव्हता. एशियन समुद्रात रशियन तेल जहाजे होती.

रशियाकडून युरल्स, एस्पो आणि वरांडे या श्रेणीच्या तेलाचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यासाठी प्रतिबॅरल दोन ते 8 डॉलरची सवलत देण्यात आली आहे. आखाती युद्धापूर्वीदेखील रशिया अशाच सवलतीच्या दरात तेलाची विक्री करत होता. सुमारे एक कोटी बॅरल तेल इंडियन ऑईलनेच खरेदी केले आहे. इंडियन ऑईल आणि रिलायन्स या दोन्ही कंपन्यांनी या वृत्तावर तत्काळ प्रतिक्रिया दिलेली नाही. ‘मायलो’ आणि ‘सारा’ ही दोन्ही जहाजे आखाती युद्धापूर्वी सिंगापूरकडे रवाना झाली होती. युद्धामुळे आशियाई समुद्रात थांबली होती.

अशी होती रशियन तेल खरेदी...

रशियाने युक्रेनवर 2022 साली हल्ला केला. त्यापूर्वी भारत रशियाकडून कच्च्या तेलाची नाममात्र खरेदी करत होता. पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध घातले. त्यानंतर रशियाने सवलतीच्या दरात कच्च्या तेलाची विक्री सुरू केली. नंतर भारताची तेल खरेदी वाढली. अगदी 2024 च्या मध्यावर दररोज 20 लाख बॅरलहून अधिक तेल रशियाकडून खरेदी केले जात होते. देशाच्या एकूण गरजेच्या 35 ते 38 टक्के वाटा एकट्या रशियाचा होता. फेब—ुवारी 2026 मध्ये रशियन तेल खरेदी दररोज 10.06 लाख बॅरलवर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT