नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारताचा सांस्कृतिक वारसा परत मिळवण्याच्या मोहिमेला मोठे यश आले असून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने गुरुवारी (दि. २६) परदेशातून परत आणलेल्या तीन पुरातन कांस्य मूर्ती तामिळनाडू पोलिसांच्या मूर्तिचोरी प्रतिबंधक शाखेकडे सुपूर्द केल्या. नवी दिल्लीतील ‘एएसआय’ मुख्यालयात महासंचालक यदुबीरसिंह रावत यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
१) संत सुंदरर व परवाई नचियार : विजयनगर साम्राज्य काळातील (१६ वे शतक) ही मूर्ती तामिळनाडूतील विल्लुपूरम जिल्ह्यातील मंदिरातील आहे. अमेरिकेतील संग्रहालयाने ती परत केली आहे.
२) कन्नप्पा नयनार : नेदरलँडमधून परत आणलेली ही ११ व्या शतकातील चोलकालीन मूर्ती नागपट्टिनम जिल्ह्यातील मंदिरातील आहे. युरोपियन कला प्रदर्शनात ही मूर्ती आढळून आली होती.
३) सोमास्कंद : तंजावर जिल्ह्यातील ही १२ व्या शतकातील चोलकालीन मूर्ती स्मिथसोनियन संग्रहालयातून परत आली.