Theft  AI Generated Image
राष्ट्रीय

Crime News : चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला! 80 हजारांच्या चोरीसाठी गमवावी लागली २ लाखांची बाईक

चोरट्यांचा प्लॅन यशस्वी झाला होताच... तोपर्यंत दगाफटका झाला.....

Anirudha Sankpal

Crime News Thieves loot 80 Thousands but lose 2 lakh Bike :

..ते म्हणतात ना.. करायला गेलो एक झालं भलतंच! असाच एक प्रकार एका चोराच्या टोळी बाबत झालाय. ही चोरांची टोळी अत्यंत तोऱ्यात व्यापाऱ्याच्या ८० हजार रूपयांवर डल्ला मारण्याच्या तयारीत होती. मात्र चक्र अशी काही फिरली की त्यांना तेथून पळ काढावा लागला. एवढंच नाही तर त्यांना त्यांची २ लाख रूपये किंमतीची बाईक देखील तिथंच टाकून पसार व्हावं लागलं.

हा संपूर्ण प्रकार हा भोपाळ येथील अयोध्या नगरमध्ये घडला. त्याचं झालं असं... रात्री ११ वाजण्याच्या सुमारास किराणा व्यापारी नीरज हे आपल्या घरी परतत होते. त्यांनी आपल्या सोबत गेल्या काही दिवसात कमवलेला गल्ला देखील घेतला होता. तेवढ्यात तीन जणांची चोरट्यांची टोळी मोटरसायकलवरून आली. त्यांनी कानोसा घेत नीरज यांच्या हातातील बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.

यादरम्यान नीरज आणि चोरट्यांमध्ये झटापट झाली. त्यात नीरज यांची स्कुटर कलंडली कॅशनं भरलेली बॅग हातातून निसटली. याचा फायदा घेत चोरट्यांनी पैशाची बॅग उचलली आणि आपली मोटरसायकल सुरू करू लागले. मात्र त्यांच्या मोटरसायकलनं त्यांना ऐनवेळी दगा दिला. मोटर सायकल सुरूच झाली नाही. तेवढ्यात नीरज यांचा आरडा ओरडा ऐकून स्थानिक लोकं त्यांच्या मदतीसाठी आले. यामुळं घाबरलेल्या चोरांनी आपली मोटरसायकल तिथेच सोडली अन् पळून गेले.

दरम्यान, हा संपूर्ण प्रकार झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी जवळपास २ लाख रूपये किंमतीची बाईक ताब्यात घेतली. पोलिसांनी सांगितले की त्यांनी गाडीच्या नंबर प्लेटवरून चोरट्यांच्या गँगची ओळख पटवली आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणाचा लवकरच छडा लावला जाईल असा विश्वास पोलिसांना आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT