पुढारी ऑनलाईन डेस्क: गेल्या काही काळापासून आजारी असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे पवित्र इस्टरच्या दुसऱ्या दिवशीच सोमवारी (21 एप्रिल) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आता त्यांचा उत्तराधिकारी निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
परंपरेनुसार, 80 वर्षांखालील 138 कार्डिनल्सची कॉन्क्लेव्ह (गोपनीय सभा) बोलावली जाईल, जे पुढील पोपची निवड करतील. मीडिया रीपोर्टनुसार, या यादीत 4 भारतीय कार्डिनल्सचाही समावेश आहे. (Four Indian Cardinals eligible to vote for new Pope)
भारतामध्ये एकूण 6 कार्डिनल्स आहेत, पण त्यापैकी दोघे 80 वर्षांहून अधिक वयाचे असल्याने त्यांना नवीन पोपच्या निवडीत मतदानाचा अधिकार नाही. कोणते कार्डिनल मतदान करतील, त्याबाबत जाणून घेऊया...
हे भारतातील सर्वात तरूण कार्डिनल आहेत. त्यांचे वय 51 वर्षे आहे. केरळच्या सायरो-मलबार चर्चचे आर्चबिशप असलेले जॉर्ज हे वॅटिकनचे मुत्सद्दी आहेत.
त्यांनी पोप फ्रान्सिसच्या परदेश दौर्यांचे आयोजन केले होते. 2004 मध्ये त्यांना पाद्री म्हणून दीक्षा मिळाली आणि 20 वर्षांनी त्यांना कार्डिनल बनवण्यात आले.
भारतातील पहिले दलित कार्डिनल होण्याचा मान अँथनी पूला यांना मिळाला आहे. ते 63 वर्षांचे आहेत. त्यांची कार्डिनल म्हणून नियुक्ती ही जातीभेद नष्ट करण्याच्या दृष्टीने एक ऐतिहासिक क्षण मानला जातो.
बासेलिओस यांचे वय 64 वर्षे असून ते तिरूअनंतपुरमचे मेजर आर्चबिशप आणि सायरो मलंकरी कॅथोलिक चर्चचे मेजर आर्चबिशप-कॅथोलिकोस आहेत. 1986 मध्ये त्यांनी पाद्री पदाची दीक्षा घेतली आणि 26 वर्षांनी त्यांना कार्डिनल म्हणून बढती मिळाली.
पुढील पोप निवडण्यासाठी मतदान करणाऱ्या भारतीय कार्डिनल्समधील हे सर्वात वयस्कर आहेत. त्यांचे वय 72 वर्षे आहे. सामाजिक न्याय आणि हवामान बदल यासाठी कार्य करणारे फेऱाओ 1979 मध्ये पाद्री झाले. 43 वर्षांनी त्यांना कार्डिनलपद बहाल करण्यात आले.