राष्ट्रीय

आयुष्मान योजनेचा तिसरा टप्पा सुरू

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  आयुष्मान योजनेचा तिसरा टप्पा रविवारी सुरू झाला आहे. तिसऱ्या टप्प्यात कार्ड बनवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून, यावेळी लोकांना स्वतःची ऑनलाईन नोंदणी करण्याची मुभा देण्यात आली आहे. ऑनलाईनद्वारे आयुष्मान कार्ड मिळवता येणार आहे.

स्व-नोंदणी मोडमध्ये, पडताळणीसाठी ओटीपी, फिंगरप्रिंट आणि चेहरा आदी पर्याय सत्यापनासाठी खुले असतील. मोबाईल स्मार्टफोनच्या माध्यमातून घरबसल्या नोंदणी करता येईल. मोबाईलमध्ये आयुष्मान कार्ड अॅप मात्र डाऊनलोड करावे लागेल. रेशन कार्ड, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, पॅन कार्ड किंवा इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. विनंतीच्या पडताळणीनंतर तुमचे नाव योजनेसाठी नोंदविले जाईल. आयुष्मान कार्डाच्या मदतीने लाभार्थ्यांना या योजनेंतर्गतच्या सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळू शकतील.

पात्रता तपासणी

  • आयुष्मान योजनेसाठी तुम्ही पात्र आहात की, नाही हे तपासण्यासाठी १४५५५ या क्रमांकावर फोन करू शकता.
    तुमची पात्रता तपासण्यासाठी तुम्हाला pmjay.gov.in या संकेतस्थळावरही जाता येईल.

५ कोटींवर लाभार्थी

  •  योजनेंतर्गत आतापर्यंत ५.५ कोटींहून अधिक लोकांनी उपचार घेतले आहेत. योजनेत सर्व आजारांचा समावेश आहे.
  • जुनाट आजारांचाही नव्याने समावेश करण्यात आला आहे.
  • येणे-जाणे, सर्व वैद्यकीय चाचण्या, ऑपरेशन्स, उपचार इत्यादी खर्चही योजनेंतर्गत करण्यात येईल.
SCROLL FOR NEXT