Adani-Hindenburg case
अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयाविरोधातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.  Pudhari News Network
राष्ट्रीय

Adani-Hindenburg Case: हिंडेनबर्ग प्रकरणातील पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात ३ जानेवारीच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. या याचिकेमध्ये हिंडेनबर्गच्या अहवालातील आरोपांची चौकशी एसआयटी किंवा सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती. यापूर्वी ३ जानेवारीच्या निर्णयामध्ये अदानी समूहाकडून शेअरच्या किंमतीत फेरफार केल्याच्या आरोपांचा तपास एसआयटी किंवा सीबीआयकडे सोपवण्यास न्यायालयाने नकार दिला होता.

Summary

  • अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाविरोधातील पुनर्विचार याचिका

  • हिंडेनबर्गच्या अहवालातील आरोपांची चौकशी एसआयटी किंवा सीबीआयकडे सोपवण्याची मागणी

  • याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

रेकॉर्डमध्ये कोणतीही स्पष्ट त्रुटी नाही.

सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने या प्रकरणी सुनावणी घेतली. पुनर्विचार याचिकेवर विचार केल्यानंतर आम्हाला आढळले की, रेकॉर्डमध्ये कोणतीही स्पष्ट त्रुटी नाही. सर्वोच्च न्यायालय नियम, २०१३ च्या आदेश एक्सएलव्हीआयआय नियम १ अंतर्गत पुनर्विचारासाठी कोणतेही प्रकरण तयार केले जात नाही. त्यामुळे पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आली असल्याचे न्यायालयाने सांगितले.

SCROLL FOR NEXT