राष्ट्रीय

पंतप्रधान मोदींनी घेतला जम्मू – काश्मीरच्या सुरक्षा स्थितीचा आढावा

करण शिंदे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी उपलब्ध संसाधने आणि धोरणांचा पूर्ण क्षमतेने वापर करा, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरच्या सुरक्षा आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. कुठल्याही आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याचेही आदेश त्यांनी यावेळी दिले आहेत. (PM Narendra Modi)

जम्म-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी हल्ले वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर ह्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या आढावा बैठकीसाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सदर बैठकीत दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. तसेच जम्मू काश्मीरच्या सुरक्षिततेसाठी राबविल्या जाणाऱ्या धोरणांबद्दलही अधिकाऱ्यांनी मोदी यांना अवगत केले. बैठकीदरम्यान मोदींनी दहशतवादविरोधी क्षमतांचा संपूर्ण वापर करावा, कुठल्याही संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठी तयार रहा, असे मोदींनी सरंक्षण अधिकाऱ्यांना सांगितले. सुरक्षा दलांची तैनाती आणि दहशतवादविरोधी कारवाया हाणून पाडण्याबाबत मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा आणि जम्मू व काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशीही चर्चा केली आहे. (PM Narendra Modi)

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT