Soldier online wedding
कर्तव्य बजावत असलेल्या जवानाचा निकाह मोबाईलवरून पार पडला File Photo
राष्ट्रीय

लग्नापेक्षाही ड्युटी महत्त्वाची;मोबाईलवरूनच कबूल है.. म्हणत पार पडला जवानाचा निकाह

दिनेश चोरगे

पुढारी ऑनलाईन डेस्क : एका जवानाचा निकाह बुधवारी '३ जुलै' ला होता. मात्र अमरनाथ यात्रेच्या ठिकाणी तैनात असलेल्या या जवानाला आपल्याच निकाहला (विवाह सोहळ्याला) हजेरी लावता आली नाही. तरीही त्याने ड्युटीवर राहून आपले कर्तव्य पार पाडत मोबाईलवरून आपल्याच विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली. त्यानंतर मोबाईलवरून तीन वेळा कबूल है... म्हणत या जवानाचा विवाह सोहळा पार पडला. फैजल अहमद असे या जवानाचे नाव असून तो दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील झैनापोरा येथील रहिवासी आहे.

३ जुलैला आपला निकाह असूनही हा जवान अमरनाथ यात्रेतील ड्युटीमुळे आपल्या घरी जाऊ शकला नाही. छावणीतच राहून आपले कर्तव्य पार पाडण्याचा त्याने निर्णय घेतला. ड्युटीवर असताना ग्रामीण स्वच्छता, ग्रामविकास विभाग आणि सेवा पुरवठादारांनी त्याच्या निकाहासाठी छोटेखानी समारंभ आयोजित केला होता. यावेळी उपस्थित नागरिकांसाठी चहा, मिठाई, बिस्किटांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर काझींनी मोबाईलवर विवाहाचा विधी पार पाडला. यावेळी नवरदेव जवानाने मोबाईलवरून तीन वेळा निकाह कबूल है... म्हणत या जवानाने कर्तव्याबरोबर आपला लग्नसोहळाही पार पाडला. या विशेष प्रसंगी महासंचालक (डीजी) ग्रामीण स्वच्छता अनु मल्होत्रा ​​यांनी फैजल अहमद याचे अभिनंदन केले. ते म्हणाले की फैजलचे समर्पण, त्याच्या सेवेचा आम्हाला अभिमान आहे.

SCROLL FOR NEXT