Vijay TVK Government In Trouble pudhari
राष्ट्रीय

Vijay TVK Government In Trouble: थलपती विजय यांचे सरकार अडचणीत? DMK ने लवकरच सरकार बनवण्याची केली घोषणा

Tamil Nadu Politics: विशेष म्हणजे थलपती विजयने नुकतेच त्यांच्या आमदारांची बैठक घेतली होती. त्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

Anirudha Sankpal

Thalapathy Vijay government in trouble DMK MK Stalin: तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय राजधानी दिल्लीत असतानाच राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष डीएमकेने एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी आपण लवकरच सरकार बनवणार आहे अशी ही घोषणा होती. विशेष म्हणजे थलपती विजयने नुकतेच त्यांच्या आमदारांची बैठक घेतली होती. त्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळं याच्या टायमिंगबाबत चर्चा होत आहे. विजय यांनी या बैठकीत सरकार पाडण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता देखील बोलून दाखवली. याबाबत टीव्हीकेने अजून तरी अधिकृत कोणतं वक्तव्य केलेलं नाही.

स्टॅलिन यांचे वक्तव्य अन्...

याची सुरूवात माजी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या एका वक्तव्याने सुरू झाली. सोमवारी एमके स्टॅलीन यांनी सांगितलं की त्यांचे समर्थक अजूनही त्यांना मुख्यमंत्री म्हणून बोलवतात. राज्यात लवकरच आपलं सरकार येणार आहे. विशेष म्हणजे एमके स्टॅलिन यांनी हा दावा पहिल्यांदाच केलेला नाही. माध्यामांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील काही विरोक्षी पक्ष फ्लोअर टेस्ट करण्याची मागणी करू शकतात.

स्टॅलिन यांचा मुख्यमंत्रीपदाचा दावा

स्टॅलिन हे सोमवारी डीएमके नेता केएन नेहरू यांच्या कुटुंबातील एका लग्न समारंभात आले होते. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी त्यांचे मुख्यमंत्री आणि नेहरू यांचा मंत्री म्हणून उल्लेख केला. त्यांच्याकडे ही पदे नसताना देखील असा उल्लेख करण्यात आला.

यावर माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी, 'सध्याच्या घडीला टीव्हीके खराब शासन चालवत आहे. आता मला मुख्यमंत्री संबोधलं जाणं ही लाजीरवणी गोष्ट आहे. मला मुख्यमंत्री म्हणून संबोधने बंद करा. लवकरच द्रमुक सरकार तयार करणार आहे.

विजय आमदारांच्या भेटीला

इंडियन एक्सप्रेसने १२ नोव्हेंबर रोजी एक रिपोर्ट छापला होता. त्यानुसार विजयने आपल्या आमदारांना भेटले होते. ही बैठक जवळपास ३ तास सुरू होती. विजय यांनी आमदारांशी वैयक्तिक स्वरूपात भेटले. मिळालेल्या माहितीनुसार १० आमदारांच्या एका समुहाशी त्यांनी वेगवेगळी चर्चा केली होती.

आमदारांच्या बैठकीच्या तारखेवर इंडियन एक्सप्रेसने जोर दिला होता. एका आमदाराने सांगितलं की अविश्वास प्रस्तावाला आता ६ महिने पूर्ण झाले आहेत. १३ मे १३ नोव्हेंबर या तारखा खूप महत्वाच्या आहेत असं सांगण्यात आलं आहे. १३ नोव्हेंबरनंतर देखील अजून एक अविश्वास प्रस्ताव आणळा जऊ शकतो. याबाबतची घोषणा अजून झालेली नाही.

सरकार पाडण्याची तयारी

मिळालेल्या माहितीनुसार आमदारांना सांगण्यात आलं आहे की सरकारकडे इनपुट्स आले आहेत की विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षातील नेत्यांना आपल्या गोटात खेचण्याची शक्यता आहे. डीएमके आणि एआयडीएमके दिल्लीतील राजकीय शक्तींच्या मदतीने या सत्तांतराला मूर्त रूप देऊ शकते. त्यामुळं टीव्हीकेने आपल्या आमदारांना सतर्क राहण्याचे आणि कोणताही राजकीय निर्णय ज्यामुळे तुमचे राजकीय करिअर अडचणीत येईल असे निर्णय घेऊ नयेत असा सल्ला दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT