राष्ट्रीय

Vijay CM oath : थलपती विजय यांनी शपथ घेतल्यानंतर लहान मुलांचे आभार का मानले? सुत्रे हाती घेताच जनतेसाठी घेतला दिलासा देणारा निर्णय

चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान होणारे विजय चौथे मुख्यमंत्री, घरांसाठी 200 युनिट विज फ्रि मिळणार

Namdev Gharal

C. Joseph Vijay : आज १० मे २०२६ रोजी थलपती विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन एका नवीन राजकीय पर्वाची सुरुवात केली आहे. तामिळ चित्रपटातील नायक असलेले व त्‍यानंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री विराजमान होणारे विजय हे एमजीआर यांच्या नंतर दुसरे मुख्यंमत्री ठरले आहेत. त्‍यांनी शपथ घेतल्यानंतर आपल्या पहिल्याच भाषणात तामिळनाडूतील लहान मुलांचे विशेष आभार मानले आहेत.

कानात शिट्टी वाजवा आणि विजय मामालाच मत द्या

चेन्नई येथील नेहरु स्टेडियम येथे शपथ घेतल्यानंतर पहिल्याच भाषणात त्‍यांनी लहान मुलांचा आवर्जून उल्लेख केला. त्‍यांनी सांगितले की प्रचार दौऱ्यामुध्य मी लहान मुलांना सांगितले होते की त्‍यानी आपल्या आईवडिलांच्या कानात शिट्टी वाजवा व आपल्या टीव्हिके पक्षाला मत द्या, ‘शिट्टी वाजवा व विजय मामाला मत द्या‘ असे त्‍यांने मिश्कील शैलीत म्हटले. त्‍याच्या या वाक्यावर टाळया शिट्यांचा पाऊस पडला. त्‍यांच्या टीव्हिके या पक्षाचे निवडणूक चिन्ह शिट्टी हे आहे.

जनतेला दिलासा देणारा पहिलाच निर्णय

'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्ष स्थापन करुन पहिल्याच प्रयत्‍नात विजय मिळवून त्‍यांनी काँग्रेस व डाव्या आघाडीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले आहे. विजय यांनी शपथ विधीनंतर मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतली. यानंतर त्‍यांनी पहिल्यांदाच जनतेला दिलासा देणारा निर्णय घेतला. यावेळी त्‍यांनी घरगुती वापरासाठी 200 युनिट मोफत विज देण्याचा निर्णय घेतला. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी विषेश दल स्थापन करणे, संपूर्ण राज्यात नशेच्या पदार्थावर बंदी घालणे यासारखे महत्‍वाचे निर्णय घेतले.

तामिळ चित्रपटसृष्टीतून येणारे चौथे मुख्यमंत्री ठरले

तामिळ राजकारणावर तामिळ चित्रपटांचा मोठा पगडा आहे हे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. आता विजय यांच्या विजयाने हे अधोरेखित झाले आहे. जोसेफ विजय हे चित्रपटसृष्टीतून आलेले असून पहिल्यांच प्रयत्‍नात विजय मिळवून मुख्यमंत्री बनले आहेत. यापूर्वी तामिळनाडू मध्ये एमजीआर हे चित्रपटातील नायक होते त्‍यांनीही मुख्यमंत्रीपद भूषवले आहे , जयललिता यांनीही नायिका म्हणून चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर तामिळनाडूत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तर आंध्रप्रदेशमध्ये तेलगू चित्रपटसृष्टीत हिरो असलेले एनटीआर नंतर मुख्यमंत्री झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT