पुढारी ऑनलाईन डेस्क ः
देशभरात दिवाळीचा आनंद साजरा होत असताना जम्मु काश्मिरमध्ये पुन्हा दहशवाद्यांनी भ्याड हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी बडगाम जिल्ह्यातील मजहामा मध्ये दोन मजूरांना गोळया मारुन जखमी केले. या दोंघाना रुग्णालयात भरती केले असून त्यांतची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
जखमी झालेले उत्तरप्रदेशचे रहिवाशी असून उस्मान व संजय अशी त्यांची नावे असल्याचे समजते. हे दोघे मजूर म्हणून याठिकाणी काम करत होते. या प्रकारानंतर प्रशासनाने परिसरात नाकाबंदी केली आहे. गेल्या काही दिवसात स्थलांतरीत मजूरांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केले जात असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीही १८ ऑक्टोबर रोजी बिहारच्या एका मजूराची दहशतवाद्यांनी गोळी मारुन हत्या केली होती. त्यानंतर २० ऑक्टोबरला श्रीनगर लेह महामार्गावर जैडमोढ येथे सुरु असलेल्या बोगद्या कामावरील मजूरांवर हल्ला केला होता यामध्ये ७ मजूर ठार झाले होते तर ५ जखमी झाले होते. २५ ऑक्टोबरला दक्षीण काश्मीर च्या पुलवामा जिल्ह्यात उत्तरप्रदेशचा रहिवासी असलेल्या नाभिकाची हत्या केली होती.