प्रातिनिधिक छायाचित्र.  file photo
राष्ट्रीय

Hyderabad News | हैदराबादमधील घातपाताचा कट उधळला; 'आयएस' संबंधित दोघांना अटक

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा पोलिसांनी संयुक्त कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Police foiled bomb plot in Hyderabad : हैदराबाद शहरात स्फोट घडवण्याच्या कट आंध्र प्रदेश आणि तेलंगणा पोलिसांनी संयुक्त कारवाई उधळून लावण्‍यात आला आहे. दहशतवादी संघटना 'आयएसआयएस' संबंधित दोघा संशयितांना अटक करण्‍यात आली आहे. विजयनगरम येथील सिराज उर रहमान (२९) आणि सय्यद समीर (२८) अशी अटक करण्‍यात आलेल्‍यांची नावे आहेत. शोध मोहिमेदरम्यान, अमोनिया, सल्फर आणि ॲल्युमिनियम पावडरसह इतर स्फोटके जप्त करण्यात आली. पोलिस अधिकाऱ्याने लोकांना सहकार्य करण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

विशाखापट्टणमजवळील विजयनगरम येथील दोघांच्‍या संशयास्‍पद हालचालीबाबत पोलिसांना माहिती मिळाली. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा पोलिसांच्या गुप्तचर विभागाने संयुक्त कारवाई करत विशाखापट्टणमजवळील विजयनगरम येथून रहमानला अटक केली. त्यानंतर रहमानने दिलेल्या माहितीनुसार, सय्यद समीरला हैदराबादमधून अटक करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.पोलिसांनी या दोघांच्या ताब्यातून अमोनिया, गंधक आणि अॅल्युमिनियम पावडरसह स्फोटक साहित्य जप्त केल्याचेही सांगितले.

सिराज उर रहमान याने विजयनगरममध्ये स्फोटक साहित्य खरेदी केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. हे दोघांना सौदी अरेबियातून 'आयएस'च्‍या म्‍होरक्‍याच्‍या आदेशाने ते हैदराबादमध्ये स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत होता.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर कडक कारवाई

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी जम्मू आणि काश्मीरसह अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गुरुदासपूर जिल्ह्यातील पोलिस स्टेशनवर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याच्या संदर्भात खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग उर्फ ​​रिंडा याच्याशी संबंध असलेल्या पंजाबमधील गँगस्टर हॅपी पॅशनशी संबंधित १५ ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने शुक्रवारी छापे टाकले होते.

सिराज उर रहमान आणि सय्यद समीर या दोघांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. संशयास्‍पद हालचाली आढळल्‍यास तत्‍काळ माहिती देवून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT