पुढारी ऑनलाईन :
उत्तर प्रदेशच्या गाजियाबादच्या ठाणे वेव सिटी पोलिसांनी एका युवकाच्या गुप्तांग कापल्याच्या धक्कादायक प्रकरणात खुलासा केला आहे. या घटनेत सहभागी तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. स्वत:हा पीडित व्यक्ती संजय यादवने काही किन्नर सहकार्यांसोबत याचा कट रचला होता.
संजय यादवला या परिसरातील तृतीयपंथीयांचा गुरू बनायचे होते. या परिसरातील प्रभावशाली तृतीयपंथींना या कटात अडकवून तुरूंगात पाठवण्याचा त्याचा इरादा होता. यासाठी त्याने आपल्या काही तृतीयपंथी सहकार्यांच्या मदतीने हा कट रचला होता. ही घटना २८ फेब्रुवारी रोजी बेव सिटी ठाण्याच्या क्षेत्रात शाहपूर बम्हैटा मध्ये झाली. जिथे पोलिसांना अशी सूचना मिळाली होती की, रात्रीच्या वेळी संजय यादव नावाच्या पीडित व्यक्तीला बेशुद्ध करून त्याचा प्रायव्हेट पार्ट कापण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडिताचा मुलगा प्रिंस यादवच्या तक्रारीवरून ठाणे वेब सिटी मध्ये या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांच्या तपासात असे समोर आले की, हे प्रकरण तृतीयपंथीय समुदायातील परस्परातील वादातून घडला आहे. आरोपी पीडित संजय यादव स्वत: हा काही तृतीयपंथीयांसोबत राहत होता. त्याला तृतीयपंथीयांमध्ये सामील व्हायचे होते, तसेच त्याला तृतीयपंथीयांचा गुरूही बनायचे होते, मात्र तृतीयपंथीय समुदायांच्या नियमानुसार कोणीही त्याचा प्रायव्हेट पार्ट (गुप्तांग) हटवल्याशिवाय नवा सदस्य बनू शकत नाही.
याच कारणामुळे घटनेदिवशी स्वत:हा पीडित संजयच्या सहमतीने त्याने त्याच्या तृतीयपंथी सहकार्याच्या मदतीने ऑपरेशन केले. या कामासाठी तानिया खानला १० हजार रूपये देण्यात आले, ज्यातील ५ हजार रूपये पेटीएमव्दारे आणि ५ हजार रूपये रोख देण्यात आले. परिसरातील बाकी तृतीयपंथी गटाचे नाव आरोपींच्या स्वरूपात सांगण्यात आले ज्यामुळे पारो तुरूंगात जाईल. त्यानंतर संजय स्वत:हा तृतीयपंथीयांचा गुरू बनू शकेल.
पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी जोगेंद्र उर्फ मोहिनी, तानिया खान उर्फ बंगालन आणि ब्रह्म सिंह उर्फ अजय यांना अटक केली आहे. पोलिस अधिक्षक उपासना पाण्डेय यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या माहितीवरून तिन्ही संशयित आरोपींना दिल्ली पोलिस कॉलनीजवळ शाहपूर बम्हैटा येथून अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या तानिया खानच्या विरोधात या आधीही एक प्रकरण पोलिसांमध्ये आधीच नोंद आहे. पोलिसांनी सांगितले आहे की, या प्रकरणी तपास सुरू आहे. इतर आरोपींचा तपास सुरू आहे.