पुढारी ऑनलाईन डेस्क : Jammu Accident | जम्मूहून सांगलीकोटला जाणाऱ्या एका टेम्पो ट्रॅव्हलरचा रियासी जिल्ह्यातील माहोर येथे अपघात झाला. त्यात ३ जणांचा मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या ४ जणांना उपचारासाठी जम्मूच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) पाठविण्यात आले आहे.
स्थानिक अधिकारी, बचाव पथकांसह तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून मदत कार्य सुरू केले आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे, असे रियासीचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक परमवीर सिंह यांनी सांगितले.