तेलंगणाच्‍या पसुम्यालाराम येथील सिगाची इंडस्ट्रीज फार्मा प्लांटमध्ये झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या ३४ वर पोहोचली आहे. ANI Photo
राष्ट्रीय

Telangana pharma plant explosion : तेलंगणातील केमिकल कंपनीत स्‍फोट, मृतांचा आकडा ३४ वर

तिघांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू, बचावकार्य अंतिम टप्‍प्‍यात

पुढारी वृत्तसेवा

Telangana pharma plant explosion

तेलंगणाच्‍या पसुम्यालाराम येथील सिगाची इंडस्ट्रीज फार्मा प्लांटमध्ये झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या ३४ वर पोहोचली आहे, अशी माहिती आज (दि. १ जुलै) पोलीस अधीक्षक परितोष पंकज यांनी ANIशी बोलताना दिली. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून ३१ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर तीन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. बचावकार्य अंतिम टप्पा आले आहे, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

सिगाची इंडस्ट्रीज लिमिटेड ही एक फार्मास्युटिकल कंपनी आहे. ही कंपनी सक्रिय फार्मास्युटिकल घटक (APIs), इंटरमीडिएट्स, एक्सिपियंट्स, व्हिटॅमिन-मिनरल ब्लेंड्स आणि ऑपरेशन्स अँड मॅनेजमेंट (O&M) सेवांमध्ये कार्यरत आहे. सोमवारी या केमिकल कंपनीत भीषण स्‍फोट झाला. रासायनिक अभिक्रियेमुळे ही दुर्घटना झाल्‍याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्‍यान, आरोग्यमंत्री सी. दामोदर राजनरसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी मंगळवारी सकाळी अपघातस्थळाला भेट देणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT