Telangana Salary Hike: गेल्या दशकभरात तेलंगणा राज्यावर शासकीय नोकरदारांच्या पगार आणि पेन्शन यांच्या खर्चाचा बोजा हा प्रत्येक महिन्याला ६ हजार कोटींच्या घरात गेला आहे. २०१४ मध्ये राज्याची निर्मिती झाल्यापासून जवळपास राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचे पगार हे चार पटीनं वाढले आहेत. याबाबतची माहिती सरकारच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
ज्यावेळी उर्जा विभागातील एका वरिष्ठ इंजिनिअरचा पगार हा महिन्याला ७ लाखाच्या आसपास पोहचला त्यावेळी ही माहिती तेव्हा पुढे आली. विशेष म्हणजे ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेतील दीर्घकाळ सेवेत असलेल्या एका वरिष्ठ सफाई कर्मचाऱ्याचा देखील महिन्याचा पगार हा २ लाखाच्या आसपास पोहचला आहे.
अधिकाऱ्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना एवढा मोठा पगार कसा मिळतोय याबाबत स्पष्टीकरण देखील दिलं आहे. त्यांनी हे उच्च पगार हे पाठोपाठ झालेल्या पे रिव्हिजन्समुळं झाले आहेत. हे पे रिव्हिजन निवडणूक काळात झाले आहेत. तेलंगणामध्ये सर्वाधिक पगार हा राज्या उर्जा विभागातील चीफ इंजिनिअरचा आहे. दर चार वर्षांनी झालेल्या पे रिव्हिजननंतर त्यांचा महिन्याचा पगार हा ७ लाखाच्या घरात पोहचला आहे.
ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेतील सर्वसाधारण सफाई कर्मचाऱ्याचा पगार हा महिन्याला जवळपास ७० हजारापर्यंत आहे. तर नुकतेच नोकरीला लागलेल्या सफाई कर्मचाऱ्याचा पगार हा २८ हजारापर्यंत आहे. मात्र क्लास ४ मधील दीर्घ काळ सेवा बजावत असलेल्या वरिष्ठ सफाई कर्मचाऱ्याचा पगार हा महिन्याला २ लाखाच्या घरात जात आहे.
तेलंगणा सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार जरी गगनाला भिडले असले तरी राज्याचे उत्पन्न वाढत असल्यानं सरकार कर्मचाऱ्यांचे पराग वेळेवर किंवा थोडं उशिरा देऊ शकते. ताज्या CAG रिपोर्टनुसार २०२३-२४ या आर्थिक वर्षात राज्याच्या उत्पन्नाच्या ४५ टक्के रक्कम ही पगार, पेन्शन आणि कर्जावरील व्याज देण्यातच जात आहे.
जरी तेलंगणा सरकारसमोर अनेक आर्थिक अडचणी असल्या तरी तेलंगणाची अर्थव्यवस्था वाढत आहे. त्यांचा GSDP (राज्याचं एकूण उत्पादन) १० टक्क्यापेक्षा जास्त आहे. तसेच प्रती व्यक्ती उत्पन्न देखील भारतात सर्वाधिक आहे. ही माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. त्यामुळं सरकार कल्याणकारी योजनांसाठी प्रतिबद्ध असल्याचंही ते अधिकारी सांगतात.