प्रातिनिधिक छायाचित्र. File Photo
राष्ट्रीय

हैदराबाद बॉम्‍बस्‍फोट प्रकरण : पाच दहशतवाद्यांची फाशीची शिक्षा कायम

Hyderabad bomb blast case 2013 : तेलंगणा उच्‍च न्‍यायालयाचा महत्त्‍वपूर्ण निर्णय

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हैदराबादमधील साखळी बॉम्‍बस्‍फोट प्रकरणातील दोषी ठरलेल्‍या पाच दहशतवाद्यांची फाशीची शिक्षा आज (दि. ८) तेलंगणा उच्‍च न्‍यायालयाने कायम ठेवली. २१ फेब्रुवारी २०१३ रोजी हैदराबाद शहरातील गर्दीच्या दुकान असलेल्या दिलसुखनगरमध्ये दोन प्राणघातक स्फोट झाले होते. यामध्‍ये १८ जणांचा मृत्‍यू झाला होता तर १३१ जण जखमी झाले होते. (Hyderabad bomb blast case 2013)

हैदराबादमधील दिलसुखनगरमध्ये झालेल्‍या बॉम्‍बस्‍फोट प्रकरणी १३ डिसेंबर २०१६ रोजी राष्‍ट्रीत तपास संस्‍था ( एनआयए) न्यायालयाने इंडियन मुजाहिदीनच्या या दहशतवादी संघटनेच्‍या सह-संस्थापक मोहम्मद अहमद सिद्दीबापा उर्फ ​​यासिन भटकळ, पाकिस्तानी नागरिक झिया-उर-रहमान उर्फ ​​वकास, असदुल्ला अख्तर उर्फ ​​हड्डी, तहसीन अख्तर उर्फ ​​मोनू आणि एजाज शेख यांच्यासह पाच सदस्यांना दोषी ठरवले होते. तसेच या पाच दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. दोषींनी तेलंगणा उच्‍च न्‍यायालयात या शिक्षेला आव्‍हान दिले होते

फाशीची शिक्षा कायम

न्यायमूर्ती के. लक्ष्मण आणि पी. श्री सुधा यांच्या खंडपीठाने दहशतवाद्यांनी दाखल केलेली फौजदारी पुनर्विचार अपील फेटाळून लावले. 'एनआयए' न्यायालयाने सुनावलेल्‍या फाशीचा निर्णय कायम ठेवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT