रंगारेड्डी : तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. आदिबाटला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोनगुलूरू गेटजवळ कार आणि लॉरी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात बोनगुलूरू गेट येथे झाला. कार आणि लॉरीची धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात कारमधील चार प्रवाशांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच आदिबाटला पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याबाबत अधिक माहिती देताना आदिबाटला पोलीस ठाण्याचे निरीक्षक राघवेंद्र रेड्डी यांनी सांगितले की, "अपघातातील चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. जखमी व्यक्तीवर उपचार सुरू आहेत."