Telangana Bribery Engineer | पगार दीड लाख अन्‌ संपत्ती १५० कोटींची! तेलंगणातील लाचखोर अभियंता निघाला ‘धनकुबेर’  
राष्ट्रीय

Telangana Bribery Engineer | पगार दीड लाख अन्‌ संपत्ती १५० कोटींची! तेलंगणातील लाचखोर अभियंता निघाला ‘धनकुबेर’

पुढारी वृत्तसेवा

हैदराबाद; वृत्तसंस्‍था : सरकारी व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर सातत्याने प्रहार सुरू असली तरी ही कीड खोलवर रुजल्‍याची नवनवीन प्रकरणे दररोज उघडकीस येत आहेत. ताजे उदाहरण तेलंगणातून समोर आले असून येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सरकारी अभियंत्याच्या ठिकाणांवर टाकलेल्‍या छाप्‍यांत तो १५० कोटींपेक्षा जास्त संपत्तीचा मालक असल्याचे निष्पन्‍न झाले. महिन्‍याला अंदाजित दीड ते दोन लाख रुपये महिना पगार घेणार्‍या मुत्यम व्यंकट रमणा नावाच्‍या या अभियंत्‍याने ही सारी कमाई भ्रष्‍टाचारातून कमावली होती, हे विशेष.

दोन किलो सोने, लक्‍झरी गाड्या

* चार फ्लॅटस्‌. (नोंदणीकृत मूल्य १.२३ कोटी रुपये).

* १६० चौरस जागेवर व्यावसायिक इमारत. (किंमत १.८२ कोटी).

* २५० चौरस जागेवर व्यावसायिक इमारत. (मूल्य २.९० कोटी)

* पत्नीच्या नावे नोंदणीकृत चार बांधकाम कंपन्यांच्या माध्यमातून रिअल इस्टेट व बांधकाम क्षेत्रात मोठी गुंतवणूक.

* बांधकामाधीन १० निवासी अपार्टमेंटस्‌. (२० कोटींची गुंतवणूक).

* दोन किलो सोने लक्‍झरी गाड्या महागड्या विदेशी दारूच्‍या बाटल्‍या. लाखो रुपयांची रोकड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT