तेलंगणामध्ये मोठा अपघात, बोगद्याचा काही भाग कोसळल्याने ६ कामगार अडकले File Photo
राष्ट्रीय

तेलंगणा : बोगद्यात अडकले ८ जीव; आता राहिले फक्‍त ४० मीटर अंतर, रॅट मायनर्सही मदतीला

तेलंगाणाच्या नगरकुरनूल जिल्ह्यात बोगद्यातील दुर्घटणेत ८ कामगार अडकले

निलेश पोतदार

तेलंगणा : पुढारी ऑनलाईन

तेलंगाणाच्या नगरकुरनूल जिल्ह्यात झालेल्‍या सुरूंग दुर्घटणेनंतर बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले. सोमवारी जिल्‍हाधिकारी बी संतोष यांनी सांगितले की, लष्‍कर आणि एनडीआरएफ यांच्या सहकार्यातून हे बचावकार्य चालवण्यात येत आहे. उत्तराखंडच्या सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्‍या कामगारांना वाचवणाऱ्या रॅट मायनर्सची टीम देखील रेस्‍क्‍यू ऑपरेशनमध्ये सहभागी झालेली आहे. शनिवारी बोगद्याचाचे छत कोसळल्‍यानंतर अडकलेल्‍या कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी शेवटची राहिलेली ४० मीटरच्या अंतरापर्यंत पोहोचण्यासाठी यंत्रसामग्री तैनात केली जात आहे.

जिल्‍हाधिकारी बी संतोष म्‍हणाले की, आम्‍ही एक टीम पाठवत आहोत. काल आम्‍ही शेवटच्या राहिलेल्‍या ४० मीटरपर्यंत आम्‍ही पोहचू शकलो नव्हतो, मात्र मशीनच्या मदतीने आम्‍ही तिथेपर्यंत पोहचू. यासोबतच सुरूंगातील पाणी काढण्याचे कामही सुरू आहे. आत खोदकाम करण्यासाठी मशीन पाठवले जात आहे.

'किती शक्‍यता माहिती नाही, मात्र परिस्‍थिती चांगली नाही'

बचावकार्यावर लक्ष ठेवून असलेले मंत्री जुंपल्‍ली कृष्‍णा यांनी म्‍हंटले आहे की, आत अडकलेल्‍या आठ लोकांची जीवंत राहण्याची शक्‍यता खूप कमी आहे. मी या विषयी काही सांगू शकत नाही. मात्र या ठिकाणी परिस्‍थिती योग्‍य नाही. जर थोडी जरी चांगली शक्‍यता असेल तर, आम्‍ही त्‍यांना वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्‍न करणार. अडकलेल्‍या ८ लोकांमध्य चार कामगार आणि २ कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

रेस्‍क्‍यू ऑपरेशनशनमध्ये रॅट मायनर्सचाही सहभाग

या दरम्‍यान उत्तराखंडच्या सिल्‍क्‍यारा बेंड-बरकोट बोगद्यात अडकलेल्‍या कामगारांना वाचवणाऱ्या 'रॅट मायनर्स' चे पथक दखील या बचाव कार्यात सहभागी झाले आहे. या ठिकाणी संपूर्ण काळजी घेत हे बचावकार्य सुरू असल्‍याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अचमपेट आमदार वंशी कृष्णा म्हणाल्या की, आत साचलेला गाळ टनेल बोरिंग मशीनच्या मदतीने काढला जाईल. भारतीय सैन्य आणि एनडीआरएफच्या आवाक्याबाहेर असलेल्या भागांची तपासणी करण्यासाठी बोगद्याच्या आत एक मायक्रो-कॅमेरा पाठवला जाईल, जेणेकरून अडकलेल्या लोकांची नेमकी स्थिती शोधून बचाव कार्य सोपे करता येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

इतर कामगार त्यांच्या सहकार्यांची वाट पाहत आहेत

जस-जसे बचावकार्य पुढे सरकत आहे, कामगारांकडून आपल्‍या अडकलेल्‍या सहकार्यांच्या येण्याची आशा वाढत चालली आहे. दुर्घटणेवेळी तेथे उपस्‍थित असलेल्‍या एकाने सांगितले की, घटने दिवशी २२ फेब्रुवारीच्या दिवशी सकाळी आम्‍ही जसे सुरूंगात कामासाठी गेलो, तसा अचानक पाणी वाहायला सुरू झाले आणि माती पडायला सुरू झाली.

झारखंडचा राहणारा कामगार निर्मल साहूने सांगितले की, काही लोकांनी परिस्‍थितीचा अंदाज घेत सुरूंगातून बाहेर जाण्यात यशस्‍वी ठरले. मात्र दुर्देवाने आठ जण बाहेर येउ शकले नाहीत. आम्‍हाला आशा आहे की, सरकार आमच्या सहकार्यांना सुरक्षीत बाहेर काढेल आणि आम्‍ही त्‍यांना जीवंत बाहेर आलेले पाहू.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT