Holi bhang Teacher death file photo
राष्ट्रीय

Holi bhang Teacher death: विद्यार्थ्यांसोबत होळी साजरी करताना भांग प्यायल्याने शिक्षकाचा मृत्यू

भांग पिल्यानंतर विद्यार्थ्यांसोबत होळी साजरी करताना एका शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Bhopal teacher death after bhang

भोपाळ: भांग पिल्यानंतर विद्यार्थ्यांसोबत होळी खेळताना एका शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशातील भोपाल येथे घडली आहे. कृष्णा नायक (वय २६) असे या शिक्षकाचे नाव आहे. होळी साजरी करताना अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल केले मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा नायक हे ऐशबाग परिसरातील रहिवासी होते. ते रतीबड येथील एका खासगी कॉलेजमध्ये संगणक विज्ञान विभागात बीटेक विद्यार्थ्यांना शिकवत होते. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी कृष्णा यांनी कुटुंबासोबत होळी साजरी केली. त्यानंतर दुपारी सुमारे ३ वाजता ते ऐशबागमधील नवीन नगर येथे त्यांच्या काही विद्यार्थ्यांच्या फ्लॅटवर गेले. ते घरी भांग पिऊन आले होते आणि विद्यार्थ्यांसाठीही भांगेच्या गोळ्या आणल्या होत्या. फ्लॅटवर कृष्णा आणि विद्यार्थ्यांनी एकत्र भांगचे सेवन केले आणि होळीच्या आनंदात नाचत उत्सव साजरा केला.

दरम्यान, सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास कृष्णा यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. ते दुसऱ्या खोलीत जाऊन झोपले. मात्र संध्याकाळी सुमारे ७ वाजेपर्यंत त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने विद्यार्थ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

कृष्णाच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, होळीच्या दिवशी सकाळपासूनच त्यांनी भांगचे अधिक सेवन केले होते. त्यांनी सुमारे १ लिटर दुधात ६ भांगेच्या गोळ्या मिसळून ते दूध प्यायल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. दुसरीकडे विद्यार्थ्यांनी पोलिसांना सांगितले की, कृष्णा यांनी सर्वांना भांगेचा एक-एक ग्लास दिला होता; मात्र त्यांनी स्वतः अनेक ग्लास पिले होते, त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली असावी. दरम्यान, डॉक्टरांनी मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. पोस्टमॉर्टम अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT