राष्ट्रीय

ताउक्ते चक्रीवादळ : ओएनजीसीचे ८५ कर्मचारी अजून बेपत्ता; २२ मृतदेह मिळाले

Pudhari News

मुंबई; पुढारी ऑनलाईन : तोक्ते वादळामुळे भरकटलेल्या ओएनजीसीच्या चार बार्जमधील कर्मचाऱ्यांची शोधमोहिम अजही सुरु आहे. अजून ८५ कर्मचारी बेपत्ता आहेत. मुंबईच्या किनाऱ्यापासून ३५ नॉटिकल माईल्सवर बुडालेल्या बार्जवर २६१ कर्मचारी होते. नौदलाने शोध मोहिम सुरु केल्यानंतर या बुडालेल्या या बार्जमधून आतापर्यंत २२ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने कालपासूनच आपली शोधमोहिम सुरु केली आहे. पण, समुद्र खवळला असल्याने काल त्यांच्या बचाव आणि शोध मोहिमेला मर्यादा येत होत्या. 

नितीन गडकरींकडून काल 'तो' सल्ला अन् आज स्पष्टीकरण!

दरम्यान, डिफेन्स पीआरओने बुधवारी एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. या व्हिडिओत आयएनएस कोची पी ३०५ बार्ज मधील १८८ कर्मचाऱ्यांना घेऊन मुंबईच्या किनाऱ्यावर आली. त्यानंतर आयएनएस कोलकाताही आज मुंबईच्या बंदरावर वाचवलेल्या कर्मचाऱ्यांना घेऊन आली. 

डिफेन्स पीआरओने 'आयएनएस कोची पी ३०५ बार्जमधून वाचवलेल्या कर्मचाऱ्यांना घेऊन मुंबईच्या बंदरावर आली. नौदलाच्या नौका टेग, वेटवा आणि बियास याचबरोबर पी ८१ विमान आणि सी किंग हेलिकॉप्टर शोध आणि बचाव मोहिमेवर रवाना झाली आहेत.' असे ट्विट केले.  

नवरदेवाचा फक्त पाच दिवसांत कोरोनाने मृत्यू!

वाचवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी ते नौदलाची मदत येईपर्यंत कसे पाण्यात तरंगत राहिले आणि जिवंत राहिले हे सांगत होते. ओएनजीसीच्या पी ३०५ वर काम करणाऱ्या मनोज गितेने पीटीआयला सांगितले की, 'बार्जवर अत्यंत भयानक स्थिती होती. मला वाटत नव्हते की मी वाचू शकेन. पण, मी पाण्यात सात ते आठ तास पोहत होते. मला जिवंत रहायचे होते. अखेर नौदलाने मला वाचवले.'

ओएनजीसीच्या तेल उत्खनन प्रकल्पावर एफकॉन या करारबद्ध केलेल्या कंपनीने पी ३०५ बार्ज आणि त्याचा जोडीला गाल कन्स्ट्रक्टर आणि सपोर्ट स्टेश ३ पाठवले होते. गाल कन्स्ट्रक्टवरील सगळे १३७ कर्मचाऱ्यांना काल तटरक्षक दलाने वाचवले होते. तर २०१ कर्मचारी असलेले सपोर्ट स्टेशन ३ बार्ज हे मुंबई हाय ऑईल फिल्डपासून उत्तरपश्चिम दिशेला भरकट गेले. 

याचबरोबर ओएनजीसीच्या तेल उत्खनन प्रक्रियेतील जहात सागर भुषणवरील १०१ कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. वादळात या जहाजाचा अँकर तुटला आणि ते उत्तरेकडे भरकटत गेले. 

 

SCROLL FOR NEXT