Administrator
राष्ट्रीय

'टाटा'च्या iPhone प्लांटमध्ये २० हजार जणांना नोकरीची संधी

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क

टाटा इलेक्ट्रॉनिक्स (Tata Electronics) लवकरच तामिळनाडू येथील होसूर येथील नवीन आयफोन (iPhone) असेंब्ली प्लांटमध्ये २० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. यामुळे प्लांटमधील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ४० हजार होईल, अशी माहिती टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी शनिवारी तामिळनाडूमधील राणीपेट येथे बोलतान दिली. याबाबतचे वृत्त बिझनेस स्टँडर्डने दिले आहे.

पानापक्कम येथील टाटा मोटर्स आणि जेएलआर यांच्या ९ हजार कोटी रुपयांच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी चंद्रशेखरन उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. सध्या तामिळनाडूतील टाटा समूहाच्या टीसीएस, टायटन, टाटा केमिकल्स, टाटा पॉवर, आयएचसीएल आणि त्याच्या रिटेल व्यवसायांत मिळून सुमारे दीड लाख कर्मचारी काम करत आहेत.

एका वर्षात कर्मचाऱ्यांची संख्या दुपटीने वाढणार

“गेल्या तीन वर्षांत आम्ही होसूर, कृष्णगिरी येथे आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स फॅक्टरी उभी केली आहे. येथे सध्या २० हजार लोक काम करतात. त्यात १५ हजारांहून अधिक अधिक महिला आहेत. आणखी एका वर्षात येथील कर्मचाऱ्यांची संख्या दुपटीने वाढून ४० हजार होईल." असे चंद्रशेखरन म्हणाले.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, दीड लाख थेट कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त आणखी लाखो लोक कंपनीच्या संपूर्ण इकोसिस्टमवर अवलंबून असतील.

कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी २,२०० कोटींची गुंतवणूक

गेल्या तीन वर्षांत, टाटा समूहाने तामिळनाडूमधील टाटा पॉवर, टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि टाटा मोटर्स आदी तीन प्रमुख मॅन्यूफॅक्चरिंग युनिट्समध्ये गुंतवणूक केली आहे. तमिळनाडूच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये तरुणांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी २,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

२५० एकरमध्ये असेंब्ली प्लांट

तामिळनाडूतील होसूर येथील टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा आयफोन मॅन्यूफॅक्चरिंग प्लांट या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. २५० एकरमध्ये असलेला होसूर येथील ॲपलचा भारतातील हा चौथा असेंब्ली प्लांट आहे.

Tata Electronics : वर्षभरात प्लांट कायान्वित होईल

ब्लूमबर्गच्या याआधीच्या एका रिपोर्टनुसार, या प्लांटचे पुढील दोन वर्षांत सुमारे ५० हजार लोकांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे. हा प्लांट १२-१८ महिन्यांत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT