पुढारी ऑनलाईन डेस्क : Punjab Encounter | पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील खेडा गावात गुंड आणि पंजाब पोलिसांमध्ये चकमक झाली आहे. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत दोन गुंड जखमी झाले तर तिसऱ्याला पकडण्यात आले. त्यांच्याकडून दोन ३२ बोअर पिस्तूल आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
जम्मू-काश्मीर-राजस्थान राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या नौशेरा पन्नूआ शहराजवळ पोलीस आणि तीन दुचाकीस्वार गुंडांमध्ये ही चकमक झाली. तरनतारनचे एसपी अजय राज सिंह म्हणाले की, गुन्हेगार गोपी नंबरदारच्या संपर्कात होते. तो खेडा गावात येत होता. आज सकाळी पोलीस गस्त घालण्यासाठी जात असताना त्यांना माहिती मिळाली की काही संशयास्पद लोक खेडा गावात येत आहेत. त्यानुसार पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी गोळीबार केला.