Tamil Nadu Temple Alien Worship | तामिळनाडूतील मंदिरात चक्क एलियनची पूजा 
राष्ट्रीय

Tamil Nadu Temple Alien Worship | तामिळनाडूतील मंदिरात चक्क एलियनची पूजा

अरुण पाटील

चेन्नई; वृत्तसंस्था : जगात विविध धर्माचे लोक राहतात आणि ते वेगवेगळ्या रूपांत देवाची पूजा करतात; पण तुम्ही कधी कुणाला एलियनला देव मानून त्याची पूजा करताना पाहिले आहे का? जर नसेल, तर ही बातमी तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करेल. कारण, भारताच्या तामिळनाडू राज्यात एक असे मंदिर आहे, जिथे कोणत्याही देवी-देवतेची नव्हे, तर चक्क एलियनची मूर्ती आहे आणि पुजारी एलियनलाच देव मानून त्याची पूजा करतात.

पुजार्‍याचा दावा आहे की, हा एलियन भगवान शंकराने निर्माण केलेला जगातील पहिला देव असून, तो जगाला मोठ्या आपत्तींपासून वाचवेल. सेलम जिल्ह्यातील मल्लपट्टी येथील रामगौंडनूरचे रहिवासी असलेल्या लोगनाथन यांनी गेल्या वर्षी या मंदिराची स्थापना केली. हे एक भूमिगत मंदिर आहे, जे जमिनीखाली सुमारे ११ फूट खोल आहे. या मंदिराचे बांधकाम 2021 पासून सुरु आहे. हे मंदिर लोगनाथनचे गुरु सिद्ध भाग्य यांच्या जीवनसमाधीजवळ बांधण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT