राष्ट्रीय

Jana Gana Mana | ‘जन गण मन....’ तामिळनाडूच्या विधानसभेत २५ वर्षांनंतर अधिवेशनाच्या सुरवातीलाच उमटले राष्ट्रगीताचे सूर!

राज्यगीत व राष्ट्रगीत यावरुन तामिळनाडू विधानसभेत होता वाद, मुख्यमंत्री थलपती विजय सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात सुरवातीला राष्ट्रगीताचे सादरीकरण, २५ वर्षांनंतर परंपरेत बदल

पुढारी वृत्तसेवा

Jana Gana Mana तमीळ भाषेचा, संस्कृतीचा तमीळ लोकांना खूप अभिमान आहे, पहिल्यापासून त्‍यांचा हिंदीला राष्ट्रभाषा करण्यास विरोध आहे. तमीळ अस्मितेसाठी ते कोणतीही टीका झेलण्यास तयार असतात. याचाच भाग म्हणजे तामिळनाडू विधानसभेत अधिवेशनाच्या सुरवातीला राष्ट्रगीत गाण्यास विरोध होता. ९० दशकापर्यंत राष्ट्रगीत सभागृहात सुरवातीला गायले जायचे. पण नंतर त्‍यात तमीळ अस्मितेचे राजकारण सुरु झाल्यावर बदल झाला अधिवेशनाच्या सुरवातीला सुरवातीलला तमीळ राज्यगीत 'तामिळ थाई वाझथू' हे राज्य गीत वाजवले जायचे त्‍यानंतर अधिवेशन संपताना शेवटी जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत गायले जायचे. त्‍यानंतर आता अभिनेते असलेले विजय थलपती तमीळनाडूचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्‍यांच्या सरकारच्या अधिवेशनाच्या सुरवातीलाच राज्यपालांच्या अभिभाषणानंतर राष्ट्रगीत गायले गेले.

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीकेच्या विजयानंतर आणि थलपथी विजय मुख्यमंत्री झाल्यानंतर हा सर्वात मोठा बदल समोर आला आहे. गुरुवारी, तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांच्या अभिभाषणानंतर राष्ट्रगीत वाजवण्यात आले. ‘अनेक दशकांपासून तामिळनाडू विधानसभेत राष्ट्रगीत गायले जात नव्हते, पण गुरुवारी 'जन गण मन अधिनायक...' हे गीत तामिळनाडू विधानसभेत निनादले.’ असा दावा तामिळनाडू भाजप नेत्या अन्नपूर्णा पिल्लई यांनी एक्स वर पोस्ट करत केला आहे. तसेच त्‍यांनी म्हटले आहे की तब्बल २५ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर तामिळनाडू विधानसभेत राष्ट्रगीत गायले गेले आहे. त्यांनी लिहिले आहे की, पण काही देशद्रोही लोकांना तामिळनाडू विधानसभेत राष्ट्रगीत गाण्यावर आक्षेप का आहे? असा प्रश्नही विचारला आहे. यावेळी राज्यपालांनी मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके सरकारची प्रशंसाही केली.

तामिळनाडू विधानसभेचे अधिवेशन १८ जून रोजी सुरू झाले, ज्यामुळे राजभवन आणि सरकार यांच्यातील दीर्घकाळ चाललेला तणाव संपुष्टात आला. अधिवेशनाची सुरुवात पारंपरिक 'तामिळथाई वाझथू'ने झाली आणि त्यानंतर लगेचच राष्ट्रगीत वाजवण्यात आले. विधानसभेच्या नियमांमधील दुरुस्त्या आणि शांत वाटाघाटींनंतर हा बदल झाला.

राज्यपालांचे भाषण व्यत्‍ययाशिवाय

नवीन कार्यपद्धती औपचारिकपणे स्वीकारण्यात आल्याचा दावा केला जात आहे. राज्यपालांचे पारंपरिक भाषण कोणत्याही व्यत्ययाशिवाय पार पडले. तामिळनाडू विधानसभेत अधिवेशनाच्या सुरुवातीला 'तामिळथाई वाझथू' आणि शेवटी राष्ट्रगीत वाजवण्याची परंपरा होती. तामिळनाडू विधानसभेतील संघर्षानंतर गुरुवारी सर्व काही सुरळीतपणे पार पडल्याने, उद्घाटन सत्राचा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे.

नेमका वाद काय आहे?

हा वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा तमीळनाडूचे माजी राज्यपाल आर. एन. रवि यांनी या परंपरेवर आक्षेप घेतला. त्यांचा युक्तिवाद असा होता की, केंद्र सरकारच्या नियमांनुसार किंवा इतर राज्यांच्या परंपरेनुसार राज्यपाल जेव्हा आपले भाषण सुरू करतात, तेव्हा भाषण सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवले गेले पाहिजे.

तमीळनाडू सरकारचे म्हणणे होते की, विधानसभेची स्वतःची सार्वभौम परंपरा आहे आणि आम्ही राष्ट्रगीताचा कोणताही अवमान करत नाही, ते अधिवेशनाच्या शेवटी पूर्ण आदराने गायले जातेच. या वेळेच्या फरकामुळे राज्यपालांनी विधानसभेतून वॉकआउट (Walkout) देखील केला होता. पण आता मुख्यमंत्री विजय यांनी मधला मार्ग स्वीकारत पहिले राज्यगित व त्‍यानंतर राष्ट्रगीत सादर केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT