ताजमहाल परिसराची तपासणी करताना पोलीस कर्मचारी. Pudhari
राष्ट्रीय

ताजमहाल बॉम्बने उडवण्याची धमकी, परिसरातील सुरक्षेत वाढ

पर्यटन विभागाला ईमेलद्वारे धमकी, परिसरात बॉम्ब निकामी पथकासह श्वान पथकही दाखल

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आग्रा येथील ताजमहाल बॉम्बने उडवून देवू, असा धमकीचा ई-मेल मिळाल्याने खळबळ उडाली आहे. बॉम्ब निकामी पथक ताजमहल परिसरात दाखल झाले असून येथील सुरक्षा व्‍यवस्‍थेतही वाढ करण्‍यात आली आहे.

"पर्यटन विभागाला ईमेल प्राप्त झाला. त्याआधारे ताजगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती ताजमहल सुरक्षा एसीपी सय्‍यद अरीब अहमद यांनी सांगितले. ताज महलच्‍या सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत कडकोट करण्‍यात आली आहे. त्‍याचबरोबर बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकही येथे दाखल झाले. या तपासणीदरम्यान पर्यटकांमध्ये कोणतीही दहशत निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. परिसरात तपासणी केली जात आहे. कोणत्‍याही प्रकारची संशयास्‍पद वस्‍तू आढळलेली नाही, असेही पोलिसांनी स्‍पष्‍ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT