Swati Maliwal assault case
स्वाती मालीवाल प्राणघातक हल्ला प्रकरणी दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी बिभव कुमार यांच्याविरोधात आज दिल्ली न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्‍यात आले. File Photo
राष्ट्रीय

स्वाती मालीवाल हल्ला प्रकरण: बिभव कुमार यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : स्वाती मालीवाल प्राणघातक हल्ला प्रकरणी दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी बिभव कुमार यांच्याविरोधात आज (दि.१६) दिल्ली न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्‍यात आले.

स्‍वाती मालीवाल हल्‍ला प्रकरणी बिभव कुमार यांना १ जून रोजी १४ दिवसांची न्‍यायालयीन कोठडी सुनावण्‍यात आली होती. यानंतरत्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. दिल्‍लीतील तीस हजारी न्‍यायालयाने १६ जुलैपर्यंत त्‍यांच्‍या न्‍यायालयीन कोठडीत वाढ केली हाेती.

काय घडलं होतं?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी बिभव कुमार यांच्यावर आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी मारहाणीचा आरोप केला आहे. मालीवाल यांनी दिलेल्‍या फिर्यादीनुसार, त्‍या १३ मे रोजी सकाळी अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी त्यांच्या सरकारी निवासस्थानी गेल्‍या होत्‍या. त्‍यावेळी बिभव कुमार आणि यांच्यात वाद झाला. यानंतर बिभव कुमार यांनी त्‍यांना मारहाण केली. 'छाती, पोट आणि ओटीपोटावर लाथ मारली. तसेच जीवे मारण्‍याचीही धमकी दिली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्यासाठी विशेष तपास पथमाची ( एसआयटी )स्थापना करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी सीएम हाऊसमधून इतर कागदपत्रांसह डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर (डीव्हीआर) जप्त केले होते आणि ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले होते.

SCROLL FOR NEXT