Garudastra Mortar System | स्वदेशी ‘गरुडास्त्र’ मोर्टार सिस्टीमची यशस्वी चाचणी File Photo
राष्ट्रीय

Garudastra Mortar System | स्वदेशी ‘गरुडास्त्र’ मोर्टार सिस्टीमची यशस्वी चाचणी

भारतीय लष्कराला नवे बळ : शत्रूचे बंकर होणार उद्ध्वस्त

पुढारी वृत्तसेवा

महू (मध्य प्रदेश); वृत्तसंस्‍था : भारताच्या संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. पुणेस्थित ‘नाइबे लिमिटेड’ या संरक्षण तंत्रज्ञान कंपनीने आपल्या अत्याधुनिक ‘गरुडास्त्र’ १२० मिमी व्हेईकल-माउंटेड मोर्टार सिस्टीमचे यशस्वी प्रात्यक्षिक दाखवले.

अशी आहेत ‘गरुडास्त्र’ची वैशिष्ट्ये

‘शूट अँड स्कूट’ तंत्रज्ञान : गरुडास्त्र केवळ ३० सेकंदांच्या आत फायरिंग पोझिशनमध्ये येते. अवघ्या १५ सेकंदात २ गोळे डागून, शत्रूच्या रडारला चकवा देण्यासाठी अवघ्या १५ सेकंदात आपले स्थान बदलू शकते.

प्रचंड वेग : अवघ्या दोन जवानांच्या मदतीने ही सिस्टीम ६० सेकंदात (१ मिनिटात) तब्बल १२ गोळे डागू शकते.

अचूक मारा : ७ ते १० किलोमीटर अंतरावरील शत्रूच्या लक्ष्याचा वेध घेण्यासाठी यामध्ये जीपीएस आणि लेझर मार्गदर्शित अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.

बंकर उद्ध्वस्त करण्याची क्षमता : गरुडास्त्रमधून १७ किलो वजनाचा शक्तिशाली दारूगोळा डागला जातो, जो २० सेंमी जाडीचे काँक्रीटचे मजबूत बंकर एका फटक्यात उद्ध्वस्त करू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT