सुप्रीम कोर्टाचे Youtube चॅनल हॅक File Photo
राष्ट्रीय

Supreme Court | सुप्रीम कोर्टाचे Youtube चॅनल हॅक

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनेल आज (दि.२० सप्टेंबर) हॅक झाल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.

'बार ॲण्ड बेंच'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आह की, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब (YouTube) चॅनल हॅक झाले आहे. या चॅनेलवर सध्या अमेरिकेतील कंपनी रिपल लॅब्सने विकसित केलेल्या XRP या क्रिप्टोकरन्सीचा प्रचार करणारे व्हिडिओ दिसत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या या यूट्यूब चॅनेलवर (YouTube) सर्वोच्च न्यायालय घटनापीठांसमोर सूचीबद्ध प्रकरणे आणि सार्वजनिक हितसंबंध असलेल्या प्रकरणांच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्यात येत असते. अलीकडेच, कोलकाता आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील बलात्कार आणि खून खटल्यावरील सुओ मोटू खटल्याच्या सुनावणीचे YouTube वर थेट प्रसारण करण्यात आले होते, असेदेखील 'बार ॲण्ड बेंच'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT