supreme court  File Photo
राष्ट्रीय

"...तर पंजाबमध्‍ये 'अराजकता' निर्माण होईल" : सर्वोच्‍च न्‍यायालय

पंचायत निवडणूक प्रक्रियेस स्थगिती देण्‍यास नकार

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : न्यायालयांनी मतदानाच्या दिवशीच निवडणुकांना स्थगिती दिली तर 'अराजकता' निर्माण होईल, अशी टिपण्‍णी करत पंजाबमध्‍ये सुरु असलेल्‍या पंचायत निवडणुकांना स्‍थगिती देण्‍यास आज (दि.१५) सर्वोच्‍च न्‍यायालयाने नकार दिला. ( Punjab panchayat polls )

पंजाबमध्‍ये पंचायत निवडणुकांसाठी आज सकाळी आठ वाजता मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. सकाळी या निवडणुकांवर स्‍थगिती देण्‍यात यावी, अशी मागणी करणार्‍या याचिकेवर याचिका सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्‍यक्षतेखालील न्‍यामूर्ती जे. बी. पार्डिवाला आणि न्‍यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्‍या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली.

...तर या टप्प्यावर आम्ही हस्तक्षेप कसा करू शकतो?

आज पंजाबमध्‍ये पंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरु झाले असेल तर या टप्प्यावर आम्ही हस्तक्षेप कसा करू शकतो? कदाचित उच्च न्यायालयाने त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन निवडणुकीवरील स्थगिती रद्द केली, असे न्यायमूर्ती जे.बी.पार्डीवाला आणि न्‍यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्‍या खंडपीठाने स्‍पष्‍ट केले. तर मतदानाच्या दिवशी निवडणुकीला स्थगिती दिल्यास राज्‍यात 'अराजकता' निर्माण होईल, अशी टिप्‍पणी सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केली. दरम्‍यान, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने अलीकडेच पंचायत निवडणुका रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळल्या होत्‍या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT