दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या 21 जूनच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्‍च न्‍यायालयात सुनावणी झाली File Photo
राष्ट्रीय

अरविंद केजरीवाल यांना 3 दिवसांची CBI कोठडी

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली येथील रोज अव्हेन्यू कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ३ दिवासांची सीबीआय कोठडी दिली आहे. मद्यधोरण प्रकरणी सीबीआयने केजरीवाल यांना बुधवारी अटक केली होती. कोठडीच्या काळात केजरीवाल यांचे वकील आणि त्यांच्या पत्नी दररोज ३० मिनिटांसाठी त्यांना भेटू शकतात. कोर्टाने औषधे आणि घरी बनवलेले जेवण घेण्यास केजरीवाल यांना परवानगी दिली आहे.

केजरीवाल यांना सीबीआयने रोज अव्हेन्यू कोर्टात बुधावारी सकाळी आणले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुनीता उपस्थित होत्या.

CBIकडून बदनामी, मी आणि सिसोदिया निर्दोष - केजरीवाल

सीबीआय मला बदनाम करत आहे, मी आणि सिसोदिया आम्‍ही दोघेही निर्दोष आहोत. कोर्टात स्‍व:त केजरीवाल एक मिनिट बोलत होते. केजरीवाल यांच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान अरविंद केजरीवाल स्वतः उभे राहिले आणि म्हणाले की, सीबीआयकडून मीडियामध्ये असं सांगितलं जात आहे की, मी संपूर्ण दोष मनीष सिसोदिया यांच्यावर टाकला आहे. मी असे कोणतेही विधान दिलेले नाही. मी म्हणालो- मीही निर्दोष आहे... मनीष सिसोदियाही निर्दोष आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT