Supreme Court CJP Protest Pudhari
राष्ट्रीय

Supreme Court CJP Protest: 'व्हिडिओ पाहायला वेळ नाही'; सुप्रीम कोर्टाचा विद्यार्थी आंदोलन प्रकरणाच्या सुनावणीस नकार

Supreme Court CJP Student Protest: आंदोलनकर्त्यांवरील कथित पोलिस कारवाईप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तातडीच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

पुढारी वृत्तसेवा

Supreme Court CJP Student Protest: आंदोलनकर्त्यांवरील पोलिस कारवाईसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या तातडीच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यावेळी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी न्यायालयाला व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नसल्याचे स्पष्ट करत, न्यायालयाचा वेळ वाया घालवू नये, अशी टिप्पणी केली.

वकिलांची मागणी

सर्वोच्च न्यायालयात वकिलांनी विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा दावा करत त्यांनी या घटनेचे व्हिडिओ उपलब्ध असल्याचे न्यायालयाला सांगितले. या प्रकरणाची न्यायालयाने स्वतःहून (सुओ मोटू) दखल घ्यावी आणि संबंधित व्हिडिओ पाहावेत, अशी विनंतीही त्यांनी केली.

'व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही'

मात्र, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी ही मागणी तत्काळ फेटाळून लावली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "आमच्याकडे व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही." यावेळी त्यांनी संबंधित वकिलांना न्यायालयाचा वेळ वाया घालवू नका आणि स्वतःचाही वेळ वाया घालवू नका, असेही सांगितले.

विद्यार्थ्यांच्या मागण्या काय?

सुनावणीदरम्यान वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, आंदोलन करणारे विद्यार्थी नीट (NEET) परीक्षेचे पारदर्शक आणि योग्य पद्धतीने आयोजन, तसेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये (NTA) आवश्यक सुधारणा करण्याची मागणी करत आहेत. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, भविष्यात परीक्षा प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा गोंधळ होऊ नये, यासाठी परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करणे आवश्यक आहे.

न्यायालयाचा स्पष्ट मेसेज

या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला असला, तरी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरील किंवा संबंधित मुद्द्यांच्या गुणदोषांवर कोणतीही टिप्पणी केलेली नाही. न्यायालयाने केवळ तातडीने सुनावणी घेण्याची मागणी स्वीकारण्यास नकार देत, प्रक्रियेनुसारच पुढील बाबी हाताळल्या जातील, असा स्पष्ट मेसेज दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT