Sunetra Pawar 
राष्ट्रीय

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांनी दिला राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर घेतला निर्णय

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. नुकत्याच झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार निवडून आल्या. तत्पुर्वी त्या राज्यसभेत सदस्य होत्या. कायद्यानुसार एक व्यक्ती दोन सभागृहात निवडून आली असल्यास १४ दिवसांच्या आत कुठल्याही एका सभागृहाच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागतो. त्यानुसार सुनेत्रा पवार यांनी विधानसभेवर निवडून आल्यानंतर राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

सुनेत्रा पवार यांच्या ठिकाणी कोण ?

सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी राज्यसभेत कोण येणार, याची चर्चा आता दिल्लीच्या राजकीय वर्तुळातही सुरू झाली आहे. सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यापूर्वीच राज्यसभेवर आले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अनेक नेते राज्यसभेत येण्यासाठी इच्छुक आहेत. यामध्ये कोणाची वर्णी लागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT