Student attacked Teacher 
राष्ट्रीय

Student attacked Teacher| प्रेमाला दिला नकार, शिक्षिकेचे ओठच कापले : 12 वीतील विद्यार्थ्याचा प्रताप सीसीटीव्हीत कैद

उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील घटना, शिक्षिकेची प्रकृती चिंताजनक

Namdev Gharal

Student attacked Teacher उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका महविद्यालयात एका विद्यार्थ्याने महिला शिक्षिकेकडे प्रेमाची मागणी केली होती. त्‍याला समजावण्याचा प्रयत्‍न शिक्षीकेने केला पण ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. या विद्यार्थ्याने रागाच्या भरात संधी साधून शाळेच्या आवारातच हल्ला करुन शिक्षिकेच्या दोन्ही ओठ धारधार शस्त्राने कापले आहेत, या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

यासंबधीत मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून या शिक्षिकेला त्रास देत होता. त्याने शिक्षिकेसमोर 'प्रेमाचा प्रस्ताव' ठेवला होता. मात्र, शिक्षिकेने याला विरोध केला आणि त्‍याची चांगलीच कानउघाडनी केली. याच गोष्टीचा राग मनात धरून संबधित विद्यार्थी होता. संधी मिळताच विद्यार्थ्याने शाळेच्या परिसरातच शिक्षिकेवर हल्ला केला.

या चिडलेल्या विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या ओठांवर शस्त्राने हल्ला केला, ज्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शिक्षिकेला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी आग्रा येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या घटनेनंतर शाळेतील इतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी धाव घेतली, मात्र आरोपी विद्यार्थी तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला. पीडित शिक्षिकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

शिक्षक विद्यार्थी नात्‍याला काळीमा

संबधित शिक्षिका ट्युशन घेण्यासाठी जात होती तितक्यात हा विद्यार्थी तिथे आला आणि शिक्षेकला ओढत नेत होता. प्रतिकार करताच त्‍याने त्‍याच्या चेहऱ्यावर हल्ला केला. यामध्ये त्‍या शिक्षीकेचेे दोन्ही ओठ रक्तबंबाळ झाले संबधित शिक्षीका रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्‍यानंतर या विद्यार्थ्याने तेथून पळ काढला. पोलिस त्‍याचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT