Central Home Ministry  File Photo
राष्ट्रीय

बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध कठोर कारवाई करा : केंद्रीय गृह मंत्रालयाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

Central Home Ministry | खासदार राहूल शेवाळे यांनी केली होती गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यात बांगलादेश कनेक्शनचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर, महाराष्ट्रात बेकायदेशीर स्थलांतरितांवर कडक कारवाई सुरू झाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि इतर संबंधित संस्थांना बांगलादेश आणि म्यानमारमधून महाराष्ट्रात येणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात शिवसेना (शिंदे गट) उपनेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी अमित शाह यांच्याकडे बांगलादेशी घुसखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. या मागणीच्या आधारे गृह मंत्रालयाने सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जारी केले आहेत.

राहुल शेवाळे यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहीले होते. यात टाटा सोशल सायन्स इन्स्टिट्यूटच्या अहवालाचा हवाला देत महाराष्ट्र आणि मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. टाटा इन्स्टिट्यूटने त्यांच्या अहवालात म्हटले होते की, बांगलादेशी मुंबई आणि महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे राहत आहेत आणि ते गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील होऊ शकतात, ज्यामुळे मुंबईच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. काही ठिकाणी त्यांना बनावट मतदार ओळखपत्र देऊन मतदार बनवले जात आहे, जे लोकशाहीला धोका निर्माण करू शकते, असेही या अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, या धोक्याची झलक सैफ अली खानवरील हल्ल्याच्या माध्यमातून दिसून आली. अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी चाकूने हल्ला केल्याच्या आरोपाखाली एका ३० वर्षीय बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले की, त्या व्यक्तीला आपण एका बॉलिवूड स्टारच्या घरात घुसलो आहोत याची माहिती नव्हती. त्याचा हेतू चोरी करण्याचा होता. हल्लेखोराला ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेट येथून अटक करण्यात आली. भारतात प्रवेश केल्यानंतर, त्या व्यक्तीने त्याचे नाव शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर वरून विजय दास असे बदलले. आरोपी, मूळचा बांगलादेशातील झलोकाटीचा रहिवासी असूमन गेल्या पाच महिन्यांपासून मुंबईत राहत होता आणि छोटी-मोठी कामे करत होता आणि एका घरकाम करणाऱ्या संस्थेशी संबंधित होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT