सेन्सेक्स आज ८७४ अंकांनी वाढून ७९,४६८ वर बंद झाला. file photo
राष्ट्रीय

बाजाराची आश्‍वासक 'चाल', सेन्सेक्स 231 अंकांनी वधारला

Stock Market Opening Bell : जागातिक बाजारातील सकारात्‍मक संकेतांचा परिणाम

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्‍मक संकेतांमुळे आज ( दि20 ऑगस्ट) आठवड्याच्‍या सलग दुसर्‍या दिवशी भारतीय शेअर बाजार तेजीसह उघडले. सेन्सेक्स 231 अंकांनी वाढून 80,656 वर तर निफ्टी 76 अंकांनी वाढून 24,648 वर उघडला. बँक निफ्टीही 49 अंकांनी वाढून 50,417 वर उघडला आहे. दरम्‍यान, सोमवारी (१९ ऑगस्‍ट) अखेर सेन्सेक्स 12 अंकांनी घसरून 80425 वर आणि st निफ्टी 31 अंकांनी वाढून 24572 वर बंद झाला होता.

आज शेअर बाजारात व्‍यवहार सुरु होताच निफ्टीवर, बीपीसीएल, टीसीएस, टाटा मोटर्स, इंडसइंड बँकमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. तर तर ओएनजीसी, भारती एअरटेल, सिप्ला, एचसीएल टेक आणि आयटीसी हे निफ्टीचे सर्वाधिक नुकसान करणारे ठरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT