पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडू येथील समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छिमारांवर श्रीलंकेच्या समुद्री चाचांकडून हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. तामिळनाडूचे ३० मच्छिमार हे समुद्रात मासेमारी करत असताना श्रीलंकन समुद्री चाच्यांनी त्यांना लक्ष्य बनवले.
अक्कराइपेट्टई येथील सेरुधर या गावातील हे मच्छीमार शुक्रवारी तामिळनाडूच्या दक्षीण पूर्व भागातील कोडियाकरई भागात मच्छीमारी करत होते. यावेळी श्रीलंकन लुटेऱ्यांनी त्यांच्यावर हमला केला. यामध्ये जवळपास १७ मच्छीमार जखमी झाले आहेत. जखमींवर सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
याबाबात सविस्तर वृत्त असे की ३० मच्छिमार आपल्या बोटीतून मासेमारीसाठी गेले होते. त्यावेळी खोल समुद्रात एक स्पीड बोट त्यांच्यासमारे येऊन उभी ठाकली त्यामध्ये ६ हत्यारबंद लुटारु होते. त्यांनी तत्क्षणी मच्छिमारांवर हल्ला करण्यास सुरवात केली. यामध्ये १७ जण जखमी झाले.
यावेळी या लुटारुंनी बोटीवरील जीपीएस प्रणाली, मासेमारीचे जाळे इत्यादी साहित्य चोरुन नेले. याची जवळपास किंमत १० लाख रुपये होते. जखमी मासेमारांनी सांगितले की हा हल्ला भारताच्या सागरी सिमेच्या आत झाला आहे. हे आंतराराष्ट्रीय नियमांचे उल्लघंन आहे.
माध्यमांशी बोलताना एका मच्छिमाराने सांगितले की आम्ही राज्य आणि केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. की या प्रकाराबद्दल कारवाई केली पाहिजे. या हल्ल्याच्या विरोधात प्रदेशातील मच्छिमार बांधवानी एक दिवसाचा संप पुकारला आहे. तर अशाच पद्धतीने हल्ले होत राहिले तर मासेमारी कशी करायची असा प्रश्न मच्छिमारांनी उपस्थित केला आहे. दरम्यान गेल्यावर्षी डिसेंबरमध्येही अशाच पद्धतीने श्रीलंकन समुद्री चाच्यांनी तामिळनाडूच्याच मच्छिमारांवर लोखंडी रॉडने हल्ला केला होता व लूटमार केली होती.