पुढारी ऑनलाईन डेस्क : हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टी (आप) आणि काँग्रेस यांच्यातील आघाडी तुटण्याच्या मार्गावर आहे. 'आप'ने राज्यातील सर्व 90 विधानसभा जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाच्या प्रवक्त्या प्रियंका कक्कर यांनी सांगितले की, पक्षाकडून आगामी एक ते दोन दिवसांत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार. दरम्यान, काँग्रेसने 32 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
हरियाणातील आप आणि काँग्रेस यांच्यातील युतीबाबत आपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका कक्कर म्हणाल्या, " आमची चर्चा सुरू आहे. मात्र सध्या काही सांगणे कठीण आहे. हरियाणा राज्यात आम आदमी पार्टी सातत्याने काम करत आहे. आम्ही राज्यातील सर्व ९० मतदारसंघात निवडणूक लढवण्यास तयार आहोत. पण आघाडीबाबत कोणताही निष्कर्ष आताच काढता येणार नाही."