राष्ट्रीय

स्पर्मची अदलाबदल; रुग्णालयाला दंड

Arun Patil

नवी दिल्ली : इन-विट्रो फर्टिलायझेशन (आयचव्हीएफ) प्रक्रियेद्वारे पतीऐवजी अन्य पुरुषाचे स्पर्म इंजेक्शन दिल्याप्रकरणी राष्ट्रीय उपभोक्ता वाद निवारण आयोगाने पश्चिम दिल्लीतील एका रुग्णालयाला 1.5 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच ग्राहक रिलिप फंडात 20 लाख रुपये जमा करण्याचेही आदेश रुग्णालयाला दिले आहेत.

तसेच डॉक्टरसह तीन लोकांना तक्रार जणांना दहा लाख रुपये देण्यासह सांगितले आहे. हे प्रकरण 15 वर्षांपूर्वीचे आहे. 2008-2009 मध्ये एका महिलेने आयव्हीएफद्वारे गर्भधारण केली. त्यानंतर तिने डीएनए चाचणी केली. जुळ्या मुलांचा एबी+ रक्तगट निघाला तर माता-पित्याचा रक्तगट अनुक्रमे बी-पॉझिटिव्ह आणि ओ-नेगटिव्ह आहे. आयव्हीएफ शस्त्रक्रियेवेळी डॉक्टरांनी स्पर्म इंजेक्शन दिल्याचे निष्पन्न झाले.

कुटुंबाचा मानसिक आणि आनुवंशिक छळ झाल्याप्रकरणी महिलेच्या पतीने रुग्णालयाकडे 2 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली. त्यानंतर आयोगाकडे तक्रार केली.

SCROLL FOR NEXT