सोयाबीन file photo
राष्ट्रीय

महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

कृषी मंत्रालयाने दिली परवानगी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीची तारीख ३१ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्य सरकारच्या मागणीनुसार, केंद्रीय कृषी मंत्रालयाने ही परवानगी दिली आहे. या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, कृषी विभाग शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सतत कार्यरत आहे. मला हे कळवण्यास आनंद होत आहे की किमान आधारभूत किमतीवर सोयाबीनची खरेदी सुरू आहे आणि आतापर्यंत आम्ही विक्रमी १३ लाख ६८ हजार ६६० मेट्रिक टन सोयाबीन खरेदी केली आहे.

सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि राजस्थानमध्येही खरेदीची तारीख वाढवली आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त, राजस्थान सरकारकडूनही यासाठी अर्ज प्राप्त झाला होता. महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीसाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदत वाढवण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. राजस्थान सरकारनेही सोयाबीन खरेदीची अंतिम मुदत ४ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्याची मागणी केली होती. त्यानुसार राजस्थानमध्येही ४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सोयाबीनची खरेदी सुरू राहील. तसेच, तेलंगणा राज्याने अतिरिक्त खरेदीची मागणी केली होती, त्यामुळे ती देखील वाढवण्यात आली आहे.

याशिवाय, केंद्र सरकारने आज भूसंपदा विभागाच्या वतीने ५६ नवीन पाणलोट विकास प्रकल्पांना मान्यता दिली आहे. ज्यामध्ये ७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली जाईल आणि शेवटी या वॉटर शेडचा वापर मातीची धूप रोखण्यासाठी आणि मातीचे संवर्धन करण्यासाठी आणि भूजलाची पातळी वाढवण्यासाठी केला जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT