सोनिया गांधी (File Photo)
राष्ट्रीय

Sonia Gandhi Health Update | सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...

सोनिया गांधी यांना रविवारी (दि. १५) दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

अविनाश सुतार

Congress Leader Sonia Gandhi Latest News

नवी दिल्ली: काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पोटाच्या आजारामुळे सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती सर गंगाराम रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अजय स्वरूप यांनी आज (दि.१६) दिली.

सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रविवारी (दि. १५) दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोटासंबंधी त्रास होत असल्याने त्यांच्यावर गॅस्‍ट्रो विभागात तत्काळ उपचार सुरू करण्यात आले होते.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत कमी जास्त होत होते. ७ जूनरोजी त्यांना शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज येथे दाखल केले होते. तिथे त्यांचे रुटीन चेकअप करण्यात आले होते. त्‍यानंतर त्‍यांना हॉस्‍पिटलमधून घरी सोडण्यात आले होते. त्याचबरोबर पोटासंबधी समस्‍येमुळे या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापासून त्या सर गंगाराम हॉस्‍पिटलमध्ये जाऊन उपचार घेत होत्या.

दरम्‍यान, सध्या त्‍यांची प्रकृती स्‍थिर असल्‍याची माहिती रुग्‍णालयाने दिली आहे. त्‍यांच्यावर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी काँग्रेस कार्यकर्ते प्रार्थना करत आहेत.

मागील काही वर्षांपासून सोनिया गांधी यांच्या प्रकृतीच्या तक्रारी वाढल्या

ज्‍येष्‍ठ नेत्‍या सोनिया गांधी यांचे ७८ वय आहे. अलिकडे त्‍यांच्या प्रकृतीबाबत तक्रारी वाढलेल्या आगहेत. फेब्रुवारीमध्ये त्‍यांना पोटासंबधी त्रास सुरू झाला होता. सप्टेंबर २०२२ मध्ये त्‍या अमेरिकेत मेडिकल चेकअपसाठी पुत्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत गेल्या होत्या. दरम्यान, कोवीडमुळे त्‍यांचे मेडिकल चेकअप लांबणीवर टाकण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT