राष्ट्रीय

Sonam Wangchuk | "'सत्यमेव जयते' ही केवळ घोषणा नाही...." : सोनम वांगचूक यांच्‍या पत्नी गीतांजली यांची पहिली प्रतिक्रिया

Sonam Wangchuk | मुक्तपणे साधता आलेले संवाद आमच्या दोघांसाठी स्वातंत्र्याचा क्षण

पुढारी वृत्तसेवा

Sonam Wangchuk wife statement

नवी दिल्ली: लडाखमधील पर्यावरण आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची शनिवारी (दि. १४ मार्च) तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांच्या पत्नी गीतांजली जे. आंगमो यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्‍यांनी यावर आपली पहिली प्रतिक्रियाही दिली आहे.

हा आमच्या दोघांसाठी स्वातंत्र्याचा क्षण

'ANI' या वृत्तसंस्थेशी बोलताना त्या म्हणाल्या की, "'सत्यमेव जयते' ही केवळ एक घोषणा नसून ते वास्तव आहे आणि अखेर सत्याचा विजय झाला आहे. शनिवारी (दि. १४ मार्च) प्रथमच आम्हाला वेळेचे बंधन नसताना आणि कोणताही पोलीस अधिकारी शेजारी बसलेला नसताना मुक्तपणे संवाद साधता आला. हा आमच्या दोघांसाठी स्वातंत्र्याचा क्षण होता."

सोनम वांगचूक नव्‍या उमेदीने देशकार्य सूरु ठेवणार

सोनम वांगचूक आता अधिक प्रगल्भ जाणिवेने आणि नव्या उमेदीने देशासाठी आपले कार्य सुरू ठेवण्यास सज्ज आहेत. देशात काय चांगले-वाईट घडत आहे, याची जाणीव आता जनतेला झाली आहे. ही संपूर्ण घटना अनेकांसाठी डोळे उघडणारी ठरली आहे, असेही गीतांजली यांनी सांगितले.

सोनम वांगचुक यांची नजरकैद सरकारने केली रद्द

केंद्र सरकारने लडाखमधील पर्यावरण आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक त्यांच्या विरोधातील नजरकैद तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. गृह मंत्रालयाने जारी केलेल्‍या निवदेनात म्‍हटलं होतं की, सरकार लडाखमध्ये शांतता, स्थिरता आणि परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे. सर्व संबंधित पक्षांशी संवाद घडवून आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. लडाखच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना करण्याची सरकारची भूमिका कायम आहे. तसेच लडाखशी संबंधित मुद्दे चर्चेद्वारे आणि संवादाच्या माध्यमातून सोडवले जातील, अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे. यासाठी उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून चर्चा केली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT