आकाशात अध्यात्म आणि तंत्रज्ञानाचा संगम! सोमनाथ मंदिराचा ड्रोन शो, PM मोदींनी शेअर केले दिव्य क्षण File Photo
राष्ट्रीय

आकाशात अध्यात्म आणि तंत्रज्ञानाचा संगम! सोमनाथ मंदिराचा ड्रोन शो, PM मोदींनी शेअर केले दिव्य क्षण

ड्रोन तंत्रज्ञानाची कमाल! आकाशात सोमनाथ मंदिर–शिवलिंग–ब्रह्मांडाचे अद्भुत दृश्य, PM मोदींची खास पोस्ट

पुढारी वृत्तसेवा

somnath temple drone show pm modi share image

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

गुजरातच्या प्रसिद्ध सोमनाथ मंदिरात स्वाभिमान पर्व साजरे होत आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहभागी झाले. 10 जानेवारीच्या संध्याकाळी मंदिराच्या परिसरात ड्रोन शो पार पडला. ज्यामध्ये तब्बल 3 हजार ड्रोनचा समावेश करण्यात आला होता.

पंतप्रधान मोदींनी ड्रोन शो चे शेअर केले फोटो

पंतप्रधान मोदी यांनी X अकाउंटवर या ड्रोन शोचे फोटो शेअर केले आहेत. जे खूपच भव्य आणि दिव्य असल्याचे दिसून येत आहे. या ड्रोनच्या साह्याने सोमनाथ मंदिर, शिवलिंग आणि ब्रह्मांडाची प्रतिमा तयार करण्यात आल्या आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी X वर केले पोस्ट

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, सोमनाथ स्वाभिमान पर्वच्या पावन प्रसंगी सोमनाथ मंदिर परिसरात भव्यता आणि दिव्यतेने भरलेला ड्रोन शो पाहण्याचे सौभाग्य मला मिळाले. या शो मध्ये आमच्या प्राचीन आस्थेसोबतच आधुनिक टेक्नॉलॉजीच्या वापराने मंत्रमुग्ध केले.

ड्रोन शो म्हणजे काय?

ड्रोन शो म्हणजे काय ते आपण आज जाणून घेउयात. ड्रोन शो मध्ये मोठ्या प्रमाणात ड्रोन्सचा वापर करण्यात येतो. प्रत्‍येक ड्रोनवर एक लाईट बसवण्यात आलेली असते. या लाईटच्या मदतीने रात्रीच्यावेळी अंधारात अनेक इमेजेस (प्रतिमा) आकर्षक पद्धतीने बनवल्या जातात.

क्रमांकाद्वारे होते अरेंजमेंट

यासाठी एका खास सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येतो. जे त्‍या ड्रोनला कमांड देणे आणि योग्य नंबरना अरेंज केले जाते. यानंतर सॉफ्टवेअर इमेजनुसार सर्वांना कमांड देते. कोणत्‍या ड्रोनला किती उंचीवर ठेवायचे आहे ते ठरवते.

लाईटव्दारे बनते इमेज

यानंतर ड्रोन आपापल्या जागी पोहोचते तेंव्हा लाईट्स झममगू लागतात. यानंतर त्‍या लाइट्सच्या मदतीने निरनिराळी आकर्षक चित्रे तयार होतात. ही चित्रे दिसायला भव्य असतात. महत्‍वाचे म्हणजे यामध्ये कोणत्‍याही प्रकारचे प्रदूषण होत नाही.

सॉफ्टवेअरच्या मदतीने तयार होते इमेज

सॉफ्टवेअरच्या मदतीने इंडिया गेट, ताज महाल, सोमनाथ मंदिर या सारखी इमेजेस अपलोड केली जातात. यानंतर सॉफ्टवेअर त्‍याला ॲनलाईज करते आणि ड्रोनला कमांड देते. त्‍यातून साकारतात डोळ्याचे पारणे फेडणारी आकर्षक आणि भव्य दिव्य प्रतिमा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT