Snake Rescuer's Courage  
राष्ट्रीय

Snake Rescuer's Courage : काय हे धाडस! सर्पमित्राने एकाचवेळी फुत्‍कारणाऱ्या आक्रमक दोन नागांना शिताफिने पकडले

एका झाडाच्या वाळलेल्या काटकीने केले दोघांना कंट्रोल, व्हिडीओ तुफान व्हायरल

Namdev Gharal

सध्या इन्स्टा, एक्सवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक सर्पमित्र एक पडक्या भितीवर दिसून आलेले दोन नाग जातीचे साप लिलया दोन्ही हातांनी शिताफिने पकडत असल्याचे दिसत आहे. यावेळी हे दोन्ही नाग अनेकवेळा या सर्पमित्राच्या अंगावर धावून येत असल्याचे दिसत आहे. या दोन्ही नागांना हा सर्पमित्र पकडताना पाहून व नागांचा आक्रमक स्वभाव पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. हा प्रकार पाहून अनेकांनी त्‍याच्या धाडसाचे कौतूक केले आहे तर अनेकांनी आवश्यक सुरक्षा साधने वापरण्याचा सल्ला दिला आहे. हा व्हिडीओ कोणत्‍या ठिकाणचाव आहे हे स्पष्ट होत नाही.

फुत्‍कार ऐकूण भरते धडकी

हे दोन्ही नाग एका पडक्या भिंतीवर चढले होते. त्‍यांना पकडण्यासाठी सर्पमित्र त्‍यांच्या जवळ जातो, पहिल्यांदा आपली टोपी काढून त्‍यांच्या पुढे धरतो यावेळी नाग त्‍वेषाने फूत्‍कारत टोपीवर फणा आपटतात. दोन्ही नाग आलटून पालटून या टोपीवर हल्ला करण्याचा प्रयत्‍न करतात यावनंतर तो सर्पमित्र जवळच पडलेल्या एक झुडपाती अगदी छोटीशी काडी, काटकी घेतो व नागांना कंट्रोल करण्याचा प्रयत्‍न करतो.

एका हाताने एकाला दुसऱ्या हाताने दुसऱ्याला

वाळलेल्या काडीने हा सर्पमित्र यातील या भल्यामोठ्या एका नागाला हळूच कंट्रोलमध्ये आणतो त्‍याला उजव्या पटदिशी पकडतो. त्‍यानंतर तो तसाच त्‍या हात सापाला धरुन डाव्या हाताने मागील बाजूस फणा काढलेल्या नागाला काडीच्या साहाय्याने हळूच पकडतो. व दोन्ही हातात दोन्ही नाग धरुन तो अडचणीतून मोकळ्या जागेवर येतो.

पिशवीतही भरले कोणाचीही मदत न घेता एकट्याने

हे भलेमोठे नाग पकडल्यानंतर तो सर्पमित्र मोकळ्या जागी येतो व एका नागाला पिशवीत सोडतो. त्‍याचवेही दुसऱ्या हातात दुसरा नाग तसाच असतो. त्‍यानंतर तो दुसराही साप तशाच पद्धतीने पिशवीत सोडतो व ती बंद करतो. यावेळी अचानक कोणतातरी साप आक्रमक झाला असतात तर मात्र सर्प मित्राची काही खैर नव्हती. या व्हिडीओमध्ये सर्पमित्राचे नाव स्पष्ट होत नाही तर तो हिंदीमध्ये बोलत असल्याचे दिसत आहे. तो म्हणतो की दोघांना एकाचवेळी पकडल्यावर त्‍यांना पिशवीत कसे घालणार पण तो म्हणतो झाले ना घातले ना पिशवीत. नंतर तो त्‍या दोन्ही सापांना जगंलात नेऊन सोडतो. या व्हायरल व्हिडीओला लाखोमध्ये लाईक आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT