राष्ट्रीय

Lok sabha Election 2024 Result : अमेठीत स्मृती इराणी पिछाडीवर, काँग्रेसच्‍या शर्मांनी घेतली निर्णायक आघाडी

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशातील लक्षवेधी लोकसभा मतदारसंघापैकी एक असणार्‍या अमेठी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी पिछाडीवर पडल्‍या आहेत. काँग्रेसचे उमेदवार केएल शर्मा ५०,७५८ मतांनी आघाडीवर आहेत. 2019 च्या निवडणुकीत स्मृतींनी अमेठीतून राहुल गांधींचा पराभव केला होता. यावेळी राहुल यांनी अमेठीऐवजी रायबरेलीतून निवडणूक लढवली आहे. काँग्रेसने अमेठी जिंकण्याची जबाबदारी गांधी घराण्याच्या निकटवर्तीय किशोरीलाल शर्मा यांच्याकडे दिली आहे.

अमेठीमध्‍ये झाले होते ५४ टक्‍के मतदान

अमेठीमध्ये २० मे रोजी मतदान झाले होते.मतदानाची टक्‍केवारी ५४.३४ टक्‍के इतकी होती. प्रियांका गांधी यांनी स्वत: येथे किशोरी लाल यांच्यासाठी जोरदार प्रचार केला होता. राहुल आणि अखिलेश यांची संयुक्त रॅलीही झाली. आता अमेठीतील जनता अखेर कोणाला खासदार म्हणून निवडून देते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले हेाते.

अमेठी होता काँग्रेसचा बालेकिल्‍ला

२००४, २००९ आणि २०१४ मध्‍ये राहुल गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. मात्र २०१९ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. भाजपच्या स्मृती इराणी यांनी त्यांचा 50 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता.

SCROLL FOR NEXT