'Skymet'चा अंदाज : यंदा देशभरात सरासरीच्या 103 टक्के पाऊस  File Photo
राष्ट्रीय

'Skymet'चा अंदाज : यंदा देशभरात सरासरीच्या 103 टक्के पाऊस

Skymet monsoon forecast: महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस पडेल असाही अंदाज

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : यंदा देशभरात सरासरीच्या १०३% पाऊस होईल, असा अंदाज स्कायमेट (Skymet ) या संस्थेने वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर २०२५ मध्ये मान्सून समाधानकारक राहणार असून महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस पडेल, असाही अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

स्कायमेटनुसार जून ते सप्टेंबर कालावधीत सरासरीच्या ८६८.६ मिमी पाऊस पडेल, यात ५ टक्के कमी अधिक होऊ शकतात. ला निना या मोसमात कमकुवत असून मान्सूनवर विपरीत परिणाम करणाऱ्या एल निनोची शक्यता नाही. कमकुवत ला निना आणि एल निनो प्रभावी नसल्याने मान्सूनचा पाऊस चांगला होऊ शकतो. तसेच पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पुरेसा पाऊस होईल, असेही स्कायमेटने म्हटले.

स्कायमेटचा हा अंदाज देशाच्या कृषी क्षेत्रासाठी चांगली बातमी आहे. हा अंदाज खरा ठरल्यास सरकारला येणाऱ्या वर्षात अन्नधान्य महागाई नियंत्रित करण्यास मदत होईल. पावसावर अवलंबून असलेल्या राज्यांसाठी हा मान्सून जीवनरेखा ठरू शकतो.

स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंग म्हणाले की, यावर्षी एल निनोचा परिणाम होणार नाही किंवा जागतिक हवामानातील कोणताही प्रतिकूल बदल होणार नाही. तसेच मान्सूनमध्ये सुधारणाही होऊ शकते. स्कायमेटला मान्सूनचा दुसरा भाग, म्हणजेच ऑगस्ट-सप्टेंबर, पहिल्या भागापेक्षा चांगला राहण्याची अपेक्षा आहे.

२०२५ चा मान्सून अंदाज:

● स्कायमेटने म्हटले की, यावर्षी भारताच्या पश्चिम आणि दक्षिण भागात चांगल्या मान्सूनची परिस्थिती दिसून येईल.

● किनारी भागातही जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

● महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सारख्या पावसाळी भागात पुरेसा पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.

● पश्चिम घाट, केरळ, कर्नाटकच्या किनारी भागात आणि गोव्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

● ईशान्य भारत आणि उत्तर भारतातील डोंगराळ भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT