Jammu Kashmir Blast | जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ स्फोट; ६ जवान जखमी  file photo
राष्ट्रीय

जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ स्फोट; ६ जवान जखमी

Jammu Kashmir Blast | नौशेरा सेक्टरमधील घटना

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमधील नौशेरा सेक्टरमध्ये मंगळवारी (दि. १४) नियंत्रण रेषेजवळ झालेल्या सुरुंग स्फोटात सहा लष्करी जवान जखमी झाले.

गोरखा रायफल्सचे जवान सकाळी १०.४५ वाजता राजौरीतील खांबा किल्ल्याजवळ नियमित गस्त घालत असताना अपघाती स्फोट झाला. जखमी जवानांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT